Winter Health Tips : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ घ्या मुलांची काळजी ; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Last Updated:

Winter Health Tips, थंडीत लहान मुलांच्या आरोग्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक ठरतं. पालकांच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे मुलांचं आरोग्य बिघडू शकतं.

हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी ; दूर पळतील आजार
हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी ; दूर पळतील आजार
Winter Health Tips हिवाळ्यात अनेकदा प्रदूषण वाढलेलं असतं. त्यातच गारवा किंवा थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा व्यक्ती आजारी पडू लागतात. त्यामुळे थंडीत लहान मुलांच्या आरोग्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक ठरतं. पालकांच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे मुलांचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे हिवाळ्यात तुमच्या मुलाचं ताप, सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण करण्यासाठी काय करायला हवं ?याच्या सोप्या टिप्स् इथे देत आहोत.
हिवाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यावी ?
थंडीपासून मुलाचं रक्षण करण्यासाठी स्वेटर किंवा थर्मल अशा उबदार कपड्यांचा वापर वाढवा. याशिवाय तुमची मुलं 7 वर्षांपेक्षा मुलं लहान असतील तर त्यांचं लसीकरण झालंय की नाही याची खात्री करून घ्या. त्यापेक्षा जास्त वयांच्या मुलांना  डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू व्हॅक्सिन द्यावं. लहान मुलांना सर्दी  किंवा खोकला हा 4 दिवसांपेक्षा जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्या नाही तर न्यूमोनिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
न्यूमोनियाची लक्षणे कशी ओळखावी ?
जर तुमचा मुलगा जोरजोरात श्वास घेत असेल किंवा त्यांच्या श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याला त्वरीत डॉक्टरांकडे घेऊन जा. त्यापूर्वी जर मुलाला भूक लागत नसेल, तो दूध पित नसेल , मग त्याला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा. जर डॉक्टरांनी मुलाला ॲडमिट करण्याचा सल्ला दिला तर ऐका कारण एक लहानशी चूक मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकेल.
advertisement
संक्रमणापासून रोखा
आपल्या मुलांना साथीच्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. याशिवाय आपल्या घरातल्या व्यक्तींना सर्दी, खोकल्याचा आजार झाला असेल किंवा  मुलांचे मित्र-मैत्रिणींना सर्दी असेल तर तुमच्या मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवा. अशाने त्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक असते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Health Tips : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ घ्या मुलांची काळजी ; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
Next Article
advertisement
BMC Election:  'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईतल्या भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

View All
advertisement