Oral hygiene खराब टूथब्रश बनेल हार्ट ॲटॅकचं कारण, योग्यवेळी बदला टूथब्रश

Last Updated:

Excerpt Oral hygiene आपण जशी दातांची काळजी घेतो तशीच काळजी आपल्याला टूथब्रशची घ्यायला हवी. योग्य वेळेस टूथब्रश बदलला नाही तर फक्त दातांच्याच नाही तर आरोग्याच्या समस्या वाढू शकतात आणि गंभीर आजाराचा धोका उद्भवू शकतो.

प्रतिकात्मक फोटो : खराब टूथब्रश बनेल हार्ट ॲटॅकचं कारण
प्रतिकात्मक फोटो : खराब टूथब्रश बनेल हार्ट ॲटॅकचं कारण
Oral health tips in Marathi: आपल्या दैनंदिन जीवनात दात महत्त्वाची भूमिका बजावतात. कदाचित फार कमी लोकांना हे माहिती असेल की जर तुमचे दात निरोगी नसतील तर तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. दाताचं कार्य आणि आरोग्य सुरळीत राहावं यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं ते टूथब्रश. टूथब्रशमुळे दात स्वच्छ तर राहातातच मात्र हिरड्याही निरोगी राहायला मदत होते. आपण जशी दातांची काळजी घेतो तशीच काळजी आपल्याला टूथब्रशच्या बाबतीतही घ्यायला हवी. योग्य वेळेस टूथब्रश बदलला नाही तर दातांच्या समस्या वाढू शकतात.
मोठ्या आजारांना निमंत्रण
दातांमध्ये साचलेली घाण दूर करण्याचं काम टूथब्रश करतो. मात्र तुमचा टूथब्रशच खराब झाला असेल तर दात नीट स्वच्छ होणार नाहीत. त्यामुळे दातांमध्ये अन्न अडकून पडतं. हे अन्न कालांतराने सडायला लागतं. त्यामुळे दात किडायला सुरूवात होते. यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊन हिरड्यांचे आजार होऊ शकतात. जर हे इन्फेक्शन वाढलं तर ते रक्ताद्वारे शरीराच्या इतर महत्वाच्या अवयवांमध्ये म्हणजे हृदय आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचून गंभीर आजारांचा धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर निरोगी राहायचं आहे तर योग्य वेळी म्हणजेच दर तीन महिन्यांनी किंवा जेव्हा टूथब्रशचे ब्रिसल्स खराब होतील तेव्हा टूथब्रश बदलायलाच हवा.
advertisement
हिरड्यांची समस्या
खराब ब्रिसल्समुळे हिरड्यांना नुकसान होऊ शकते. जेव्हा वाकडे आणि कडक होतात तेव्हा हिरड्यांवर घासले जातात ज्यामुळे हिरड्यांना सूज येऊ शकते. कधी कधी रक्तस्त्राव होण्याची सुद्धा भीती असते. तसंच जुना टूथब्रश दात व्यवस्थित साफ करू शकत नाही. ज्यामुळे तोंडात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. जे तुमच्या श्वासातल्या  दुर्गंधीसाठी कारणीभूत ठरू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Oral hygiene खराब टूथब्रश बनेल हार्ट ॲटॅकचं कारण, योग्यवेळी बदला टूथब्रश
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement