advertisement

BMC News : मुंबई महापालिकेच्या सत्तावाटपाचा 'फॉर्म्युला' ठरला! सर्वात महत्त्वाची तिजोरी भाजपच्या हाती, शिवसेनेला काय मिळालं?

Last Updated:

महापालिकेच्या कारभारात कणा मानल्या जाणाऱ्या चार प्रमुख समित्यांच्या वाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्याचे स्वरूप समोर आले आहे.

मुंबई महापालिकेच्या सत्तावाटपाचा 'फॉर्म्युला' ठरला
मुंबई महापालिकेच्या सत्तावाटपाचा 'फॉर्म्युला' ठरला
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सत्तास्थापनेनंतर आता महत्त्वाच्या समित्यांच्या वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात सत्तेचा 'फॉर्म्युला' निश्चित झाला असून, सर्वाधिक आर्थिक अधिकार असलेल्या समित्यांवर भाजपने आपले वर्चस्व राखले आहे.
महत्त्वाच्या ४ समित्यांचे वाटप पूर्ण
महापालिकेच्या कारभारात कणा मानल्या जाणाऱ्या चार प्रमुख समित्यांच्या वाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्याचे स्वरूप समोर आले आहे. यात महापालिकेचे सर्व आर्थिक प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार असलेली आणि आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेची तिजोरी मानली जाणारी 'स्थायी समिती' भाजपने स्वतःकडे ठेवली आहे. यासह भावी पिढीचे शिक्षण धोरण ठरवणारी 'शिक्षण समिती' देखील भाजपकडेच राहणार आहे.
advertisement
दुसरीकडे, मुंबईतील जमिनीचे व्यवहार आणि भूखंडांचे आरक्षण ठरवणारी महत्त्वाची 'सुधार समिती' शिवसेनेला देण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' (BEST) परिवहन उपक्रमाची समितीही शिवसेनेकडे सोपवण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.
२० फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार
मिळालेल्या माहितीनुसार, या चार महत्त्वाच्या समित्यांचे अधिकृत वाटप २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर पुढील २ ते ३ आठवड्यांत प्रभाग समित्यांसह इतर वैधानिक समित्यांच्या वाटपाची प्रक्रिया पार पडेल. या सत्तावाटपामुळे मुंबई महापालिकेच्या रखडलेल्या धोरणात्मक निर्णयांना आता वेग येण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC News : मुंबई महापालिकेच्या सत्तावाटपाचा 'फॉर्म्युला' ठरला! सर्वात महत्त्वाची तिजोरी भाजपच्या हाती, शिवसेनेला काय मिळालं?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement