advertisement

Latur ZP Winning Candidate List: लातूर जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Latur ZP Election Results Live: लातूर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी झाली. कुणीकुणी विजयाचा गुलाल उधळला? वाचा संपूर्ण यादी...

लातूरच्या विजयी उमेदवारांची यादी
लातूरच्या विजयी उमेदवारांची यादी
लातूर: लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर कोणाचा ताबा राहणार, याचा फैसला आज मतमोजणीतून होईल. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांपैकी आणि पंचायत समितीच्या ११८ गणांपैकी विजयी उमेदवारांच्या गळ्यात आज माळ पडणार आहे.
७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी आपला कौल दिला असून मतदानाची टक्केवारी ६३.७१ इतकी नोंदवण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी २४२ तर पंचायत समितीसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण ६६१ उमेदवारांपैकी १७७ जणांचे राजकीय भवितव्य आज निश्चित होणार आहे.
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निकाल जाहीर होणाऱ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी वाढू लागली आहे.
advertisement

१४२ टेबलांवर ईव्हीएम मतमोजणी, १,२९१ कर्मचारी तैनात

मतमोजणी प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक व्हावी यासाठी जिल्ह्यात एकूण १४२ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. लातूर आणि निलंगा येथे प्रत्येकी २० टेबल्स, औसामध्ये १८, रेणापूरमध्ये १६, अहमदपूर व उदगीर येथे प्रत्येकी १४, देवणी येथे १२, चाकूर व जळकोट येथे प्रत्येकी १०, तर शिरूर अनंतपाळ येथे ८ टेबल्सवर मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी १,२९१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ईव्हीएमसोबतच टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
advertisement

२०० मीटर परिसरात निर्बंध, मद्यविक्रीवर बंदी

मतमोजणीदरम्यान शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात मतमोजणी सुरू असताना निर्बंध लागू राहतील. तसेच आजच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतमोजणी ठिकाणी मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
advertisement
मतमोजणीची ठिकाणे
अहमदपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
जळकोट : प्रशासकीय इमारत
उदगीर : कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी औद्योगिक प्रशिक्षण संस्था
देवणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्था
शिरूर अनंतपाळ : तहसील कार्यालय
चाकूर : तहसील कार्यालय
रेणापूर : शासकीय तंत्र प्रशाला (आयटीआय)
लातूर : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन
औसा : प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय परिसर
advertisement
निलंगा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिदर रोड

विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

अनुक्रमांकजिल्हा परिषद गटविजयी उमेदवारपक्ष
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Winning Candidate List: लातूर जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement