advertisement

उच्च प्रतीचे राजमा बियाण्याने देण्याचं दाखवलं आमिष, व्यापाऱ्याची 13 लाखांची फसवणूक, बीडमध्ये खळबळ

Last Updated:

अंबाजोगाई शहरात बियाणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला निकृष्ट दर्जाचे राजमा बियाणे पुरवून मोठ्या रकमेचा आर्थिक गंडा घातल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

News18
News18
बीड : अंबाजोगाई शहरात बियाणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला निकृष्ट दर्जाचे राजमा बियाणे पुरवून मोठ्या रकमेचा आर्थिक गंडा घातल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सातारा येथील एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सहा संचालकांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण 12 लाख 80 हजार 200 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे बियाणे व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई येथील गुरुवार पेठ परिसरात राहणारे सुयश प्रेमचंद मुथा हे अनेक वर्षांपासून बियाणे विक्रीचा व्यवसाय करतात. जुलै 2025 मध्ये सातारा जिल्ह्यातील येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संजय बाबासाहेब भगत आणि ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेतली. त्यांनी उच्च प्रतीच्या राजमा बियाण्याचे नमुने दाखवून मोठ्या प्रमाणात माल पुरवण्याचे आमिष दाखवले. विश्वास ठेवून मुथा यांनी 21 जुलै रोजी 85 टन राजमा बियाणे खरेदीचा करार केला आणि आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने रक्कम अदा केली.
advertisement
करारानुसार मालाची पाहणी करण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, प्रत्यक्षात दाखवलेल्या नमुन्यांप्रमाणे दर्जेदार बियाणे उपलब्ध नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तडजोडीअंती 25 टन राजमा बियाण्याची नवीन ऑर्डर देण्यात आली. यासाठी एकूण 26 लाख 31 हजार रुपये संबंधित कंपनीकडे जमा करण्यात आले. मात्र, 30 ऑगस्ट 2025 रोजी केवळ 12 टन बियाणे पाठवण्यात आले.
advertisement
पाठवलेला माल तपासल्यानंतर तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे स्पष्ट झाले. बियाण्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ, माती तसेच पेरणीस अयोग्य घटक आढळून आले. उर्वरित माल किंवा भरलेली रक्कम परत मिळावी यासाठी मुथा यांनी आरोपींशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला तसेच अपमानास्पद भाषेत उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर सुयश मुथा यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारिका सोमनाथ शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप आणि बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण या सहा संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
उच्च प्रतीचे राजमा बियाण्याने देण्याचं दाखवलं आमिष, व्यापाऱ्याची 13 लाखांची फसवणूक, बीडमध्ये खळबळ
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement