advertisement

मिरज जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : मिरजमध्ये सत्ता कुणाची? आमदार सुरेश खाडेंच्या शिलेदारांचं काय झालं?

Last Updated:

Sangli Miraj ZP election result 2026 : महायुतीचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने येथे आपले वर्चस्व टिकवण्यासाठी मोठी ताकद लावली. दुसरीकडे, महाविकास आघाडीने देखील ग्रामीण भागात तगडे उमेदवार देऊन सत्ता परिवर्तनासाठी कंबर कसली आहे.

News18
News18
Sangli Miraj ZP election result 2026 : सांगलीतील मिरजेचं राजकीय बलाबल पाहता, मिरज तालुक्यात भाजर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. महायुतीचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने येथे आपले वर्चस्व टिकवण्यासाठी मोठी ताकद लावली. दुसरीकडे, महाविकास आघाडीने देखील ग्रामीण भागात तगडे उमेदवार देऊन सत्ता परिवर्तनासाठी कंबर कसली असून अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी देखील निकालात रंगत आणली होती.
प्रशासकीय दृष्टिकोनातून, मिरज तालुक्यातील 326 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. काही तांत्रिक बिघाड वगळता, जसं की हरिपूर आणि बेडग येथे ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडले होते, मतदान शांततेत पार पडले. सोमवारी मिरजेच्या शासकीय धान्य गोदामात होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने आता जय्यत तयारी केली असून, आता चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
advertisement
दरम्यान, या निवडणुकीत 3 लाख 2 हजार 694 मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केलं. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निकालानंतर ग्रामीण भागातील हा कौल कोणाला तारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
मिरज जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : मिरजमध्ये सत्ता कुणाची? आमदार सुरेश खाडेंच्या शिलेदारांचं काय झालं?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement