Shocking Incident : काळाचा क्रूर घाला, सहा महिन्यांच्या लेकीचं तोंड पाहण्यापूर्वीच बापाचा अपघातात करुण अंत; परिसरात हळहळ
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Accident Cctv : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झालेला असून सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरात भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिकलठाणा आठवडी बाजारासमोर ही घटना घडली असून अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहाबाज कमरोद्दीन बागवान असे मृत व्यक्तीचने नाव आहे.
हसत्या-खेळत्या घराचा आधारस्तंभ कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, शहाबाज हे मिनी घाटीकडून केम्ब्रिज चौकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. चिकलठाणा आठवडी बाजारासमोर अचानक त्यांचा दुचाकीवरील तोल गेला. त्याच क्षणी मागून वेगात आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. या भीषण धडकेत शहाबाज यांचा जागीच मृत्यू झाला.
बापाच्या मायेपासून कायमचं पोरकं केलं
शहाबाज हे नारेगाव येथील अजीज कॉलनीत वास्तव्यास होते. ते चिकलठाण्यातील जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या दुकानात फायनान्सचे काम करत होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन आणि चार वर्षांची दोन लहान मुले तसेच सहा महिन्यांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कंटेनर चालकाचा शोध सुरू आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Shocking Incident : काळाचा क्रूर घाला, सहा महिन्यांच्या लेकीचं तोंड पाहण्यापूर्वीच बापाचा अपघातात करुण अंत; परिसरात हळहळ








