Health Tips : ऑफिसमध्ये एका जागी बसून मान आणि कंबर दुखते? फॉलो करा 5 टिप्स, लगेच मिळेल आराम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
अनेक जणांना वाढत्या वयामुळे किंवा ऑफिसमध्ये तासंतास एकाच जागी बसल्याने मान आणि कंबर दुखीचा त्रास होतो. अनेकदा बरेच उपाय करून देखील यापासून आराम मिळत नाही अशावेळी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.
सध्या अनेक जणांना वाढत्या वयामुळे किंवा ऑफिसमध्ये तासंतास एकाच जागी बसल्याने मान आणि कंबर दुखीचा त्रास होतो. अनेकदा बरेच उपाय करून देखील यापासून आराम मिळत नाही अशावेळी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. घरगुती उपायांमुळे मान आणि कंबर दुखीची समस्या कमी होऊ शकते.
योगा : कंबर आणि मान दुखीपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही दररोज घरी काही योगा प्रकार केले पाहिजेत. भुजंगासन हा असा योगा प्रकार आहे ज्यामुळे अंग दुखीपासून आराम मिळू शकतो. परंतु योगा करताना शरीरावर जास्त ताण देऊ नका अन्यथा समस्या कमी होण्याऐवजी वाढेल. दररोज भुजंगासन केल्याने लवचिकता वाढते.
advertisement
बॉलने मसाज करा : जर तुमची मान आकडली असेल आणि खूप वेदना होत असतील तर तुम्ही सॉफ्ट बॉलने मसाज करू शकता. हा मसाज तुमच्या मांसपेशींसाठी चांगला ठरतो. सॉफ्ट बॉल घेऊन तुम्ही ज्याठिकाणी वेदना होत आहेत अशा ठिकाणी मसाज करू शकता, अशाने लगेच आराम मिळू शकेल.
advertisement
कोमट तेलाने मालिश : तेल मालिश ही शरीरातील वेदना दूर करण्यावर रामबाण इलाज आहे. मोहरीचे तेल गरम घरून थोडे कोमट झाल्यावर ते वेदना होत असलेल्या ठिकाणी लावून मसाज करू शकता. यामुळे मांसपेशींमध्ये होणाऱ्या वेदना दूर होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. तुम्ही मोहरीच्या तेलात जिरं आणि दोन लसणाच्या पाकळ्या देखील मिक्स करू शकता.
advertisement
आईस पॅक : कंबर आणि मानेच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आईस पॅकचा वापर करू शकता. आईस पॅकला तुम्ही ज्याठिकाणी वेदना होत आहेत अशा ठिकाणी लावा. तुमच्या जवळ आईस पॅक नसेल तर तुम्ही टॉवेलमध्ये बर्फ घेऊन त्याचा शेक घेऊ शकता. बर्फाने 15 मिनिट शेक घेतल्याने आराम मिळू शकतो.
वरील उपायांमुळे मान आणि कंबर दुखीवर आराम मिळू शकतो, परंतु हे उपाय करताना तुम्ही काही गोष्टी देखील फॉलो करायला हव्यात. रात्री झोपताना तुम्ही योग्य पोझिशनमध्ये झोपावे, उपडी झोपल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच झोपताना जाड उशीचा वापर केल्याने देखील मान दुखीचा त्रास होऊ शकतो. (सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे कंबर आणि मान दुखीचा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2024 2:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : ऑफिसमध्ये एका जागी बसून मान आणि कंबर दुखते? फॉलो करा 5 टिप्स, लगेच मिळेल आराम










