Kashaya Recipe Video : चहा नको, ग्रीन टीचाही कंटाळा आलाय; एकदा बनवून पाहा टेस्टी आणि हेल्दी कषाय

Last Updated:

How To Make Khshay Recipe Video : कषाय याला आयुर्वेदिक किंवा हेल्दी चहा म्हणायला हरकत नाही. जे चहा पितात त्यांना चहा सोडायचा आहे, पण चहाशिवाय जमत नाही. त्यांच्यासाठी कषाय हा उत्तम पर्याय आहे.

News18
News18
मुंबई : भारतात चहाप्रेमींची कमी नाही. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात चहा घेतल्याशिवाय होत नाही. पण चहा आरोग्यासाठी चांगला नाही म्हणून बरेच लोक ग्रीन टीकडे वळले आहेत. पण ग्रीन टीही पिऊन अनेकांना कंटाळा येतो. चहा नको, ग्रीन टी नको... आता आम्ही तुमच्यासाठी याला पर्याय अशी भन्नाट रेसिपी आणली आहे. ती म्हणजे कषाय.
कषाय याला आयुर्वेदिक किंवा हेल्दी चहा म्हणायला हरकत नाही. जे चहा पितात त्यांना चहा सोडायचा आहे, पण चहाशिवाय जमत नाही. त्यांच्यासाठी कषाय हा उत्तम पर्याय आहे. यामुळे चहा न पिताही तुम्ही चहाची तलब आल्यावर थेट चहा न पिताही चहा पिऊ शकता. हा कषाय खरंतर ग्रीन टीपेक्षाही भारी आहे असं म्हणायला हरकत नाही. आता कषाय बनवण्यासाठी काय काय लागतं आणि ते कसं बनवायचं पाहुयात.
advertisement
कषायसाठी साहित्य
धने : अर्धा वाटी
बडिशेप : पाव वाटी
जिरे : पाव वाटी
काळे मिरी : एक चमचा (15-20)
लवंग : अर्धा चमचा  (7-8)
हिरवी वेलची : एक चमचा
जायफळ : अर्धा
गवती चहा असेल तर पावडर करून
advertisement
हळद : अर्धा चमचा
गूळ : चवीनुसार
पाणी : आवश्यतेनुसार
अश्वगंधा पावडर : एक चमचा
सूंठ पावडर : अर्धा चमचा
ज्येष्ठमध पावडर : अर्धा चमचा
वावडिंग : अर्धा चमचा
कषायची कृती
गूळ आणि पाणी वगळता इतर सगळे जिन्नस तव्यात गरम होईपर्यंत हलके भाजून घ्या. थंड झाले की मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करून घ्या. ही पावडर एका हवाबंद बरणीत झाकण घट्ट लावून ठेवा ती महिनाभर टिकते.  आता एका भांड्यात पाणी घ्या, गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात गोडव्यासाठी गूळ टाका. गूळ तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार टाका. दोन कप कषाय बनवण्यासाठी एक कप पाणी आणि एक चमचा कषाय पावडर असं प्रमाण घ्या आणि पाण्याला उकळी येऊ द्या. आता यात उकळतं दूध ओता, कारण गूळ टाकला आहे दूध फाटू शकतं.
advertisement
कषायचे फायदे
धने : बद्धकोष्ठता, अॅसिडीची कमी करते, थंडावा देते
बडीशेप : तोंडाची दुर्गंधी कमी करते, पचनक्रिया सुधारकते
जिरे : आरोग्यासाठी थंड, पचनसंस्थेसाठी उपयुक्त
हिरवी वेलची : बद्धकोष्ठता, असिडीटीचा त्रास कमी होतो
जायफळ : मानसिक तणाव कमी करते, पचनक्रिया सुधारते
advertisement
अश्वगंधा पावडर : रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झोप सुधारते, मानसिक तणाव दूर होतो.
सूंठ पावडर : सर्दी, खोकल्यावर फायदेशीर
ज्येष्ठमध पावडर : सर्दी, खोकला, घसा खवखवणं, पोटाच्या समस्येवर फायदेशीर
वावडिंग : रक्त शुद्ध करण्याचं काम करते, भूक वाढते, पोटातील कृमी पोटदुखीचे त्रास, पचन समस्येवर उपयुक्त
हळद : अँटिसेप्टिक
advertisement
(टीप : शेवटचे 4 जिन्नस तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळतील. नाही मिळाले तर सुरुवातीला उपलब्ध असलेल्या साहित्यातूनही तुम्ही कषाय बनवू शकता.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kashaya Recipe Video : चहा नको, ग्रीन टीचाही कंटाळा आलाय; एकदा बनवून पाहा टेस्टी आणि हेल्दी कषाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement