वैवाहिक आयुष्यात आहे तणाव, दररोज होतायेत वाद, तर मग सर्वात आधी करा हा उपाय
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
वैवाहिक जीवनात अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या येऊ नयेत, यासाठी नेमकं काय करावं, हे जाणून घेऊयात. यासाठी काही उपाय आहेत. याबाबत ज्योतिषाचार्य पंडित गिरजेश चतुर्वेदी यांनी महत्त्वाची माहिती दिली.
मोहित भावसार, प्रतिनिधी
शाजापुर : वैवाहिक आयुष्य हे आनंदी असावे, हे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात. मात्र, बहुतांश लोकांच्या वैवाहिक आयुष्यात वादविवाहत होतात. अगदी लहानसहान गोष्टींवरुन वाद होताना दिसतात. त्यामुळे पती-पत्नी दोघांमध्ये मतभेद होताना दिसतात. यामुळे अनेकदा प्रकरण मारहाण, हत्या, घटस्फोटापर्यंतही जाते. त्यामुळे वैवाहिक जीवनात अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या येऊ नयेत, यासाठी नेमकं काय करावं, हे जाणून घेऊयात. यासाठी काही उपाय आहेत. याबाबत ज्योतिषाचार्य पंडित गिरजेश चतुर्वेदी यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर एखाद्या दाम्पत्य म्हणजे पती-पत्नीच्या आयुष्यात वाद असतील, दु:ख असेल तर पत्नी किंवा पती दोघांपैकी एकाने आपल्या बेडरूममध्ये लव्ह बर्ड्सचा फोटो लावावा. किंवा जर त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये लव्ह बर्ड पाळले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होईल, असे ते म्हणाले.
advertisement
ज्यांचं लग्न होत नाहीये त्यांनी काय करावं -
ज्योतिषचार्य पं. गिरजेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, ज्यांचे लग्न होत नसेल तर त्यांनीही आपल्या खोलीत लव्ह बर्डचे पालन करू शकतात किंवा मग त्या लव्ह बर्डचा फोटो लावू शकतात. यामुळे त्यांची मनोकाना पूर्ण होईल. वास्तूनुसार पिवळे, केशरी किंवा हिरवे लव्ह बर्ड्स घरात ठेवल्याने कुटुंबात सुख-शांती राहते आणि शुभ कार्यात कोणताही अडथळा येत नाही, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Shajapur,Madhya Pradesh
First Published :
June 04, 2024 2:22 PM IST


