वाघांचं भारतातील सर्वात मोठं कुटूंब, 1-2 दोन नव्हे राहतात तब्बल इतके सदस्य, अनोखी गोष्ट
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
मागील 16 वर्षांपासून या भागात वाघ आहेत. मात्र आजपर्यंत या वन्य प्राण्यांमध्ये माणसांसोबत संघर्षाची एकही घटना घडलेली नाही. ते खूप आनंददायी आहेत, अशी माहिती भोपाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रितिका तिवारी, प्रतिनिधी
भोपाल : एकत्र कुटुंबपद्धती ही भारतीय संस्कृती आहे. पण असे असताना आता काही प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धती ही अनेक ठिकाणी कमी होत असल्याचे दिसून येते आहे. मात्र, तुम्ही कधी वाघांच्या कुटुंबाबद्दल ऐकलंय का. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वाघाच्या कुटुंबाबद्दल सांगणार आहोत. या वाघाच्या कुटुंबात तब्बल 25 सदस्य राहतात.
वाघांचं हे कुटुंब मध्यप्रदेशात तुम्हाला पाहायला मिळेल. जंगल आणि प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशात 25 सदस्यांचे वाघांचे कुटुंब राहतात. भोपाळ येथील समरधा रेंजमध्ये हे कुटुंब राहतो. हे वाघांचे देशातील सर्वात मोठे कुटूंब आहे.
advertisement
कोण कोण आहे या कुटुंबात -
वाघांच्या या मोठ्या कुटुंबात 3 नर, 5 मादी, 17 छावांचा (पिल्लू) समावेश आहे. हे सर्व वाघ समरधा रेंजच्या जंगलात राहतात. 10 किमी क्षेत्रफळ असलेली समरधा रेंज ही वाघांच्या या कुटुंबासाठी योग्य आहे. मागील 16 वर्षांपासून या भागात वाघ आहेत. मात्र आजपर्यंत या वन्य प्राण्यांमध्ये माणसांसोबत संघर्षाची एकही घटना घडलेली नाही. ते खूप आनंददायी आहेत, अशी माहिती भोपाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
भोपाळची इको सिस्टीम अनुकूल -
वनविभागाच्या तज्ज्ञांच्या मते, भोपाळची इको सिस्टीम वाघांसाठी चांगली आहे. त्यामुळे त्यांची संख्या येथे जास्त आहे. 25 वाघांच्या कुटुंबात 5 वाघिणी आहेत, त्यापैकी दोन वाघिणींना प्रत्येकी चार पिल्ले आहेत. तीन वाघिणींना प्रत्येकी तीन पिल्ले आहेत. या पिलांचे वय तीन महिने ते एक वर्षापर्यंत आहे. हे सर्व एकत्र जंगलात फिरतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
Location :
Bhopal,Madhya Pradesh
First Published :
June 04, 2024 12:43 PM IST
मराठी बातम्या/देश/
वाघांचं भारतातील सर्वात मोठं कुटूंब, 1-2 दोन नव्हे राहतात तब्बल इतके सदस्य, अनोखी गोष्ट