हवामान खराब, वादळासह बर्फही पडू लागला, पण भारत मातेच्या सुपूत्रीने केली अद्भुत कामगिरी

Last Updated:

आयुष्यात एकदा तरी माऊंट एव्हरेस्ट सर करावे, असे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. पण हे अत्यंत अवघड आहे, त्यामुळे ते सर करणे प्रत्येकाला शक्य होत नाही.

निशू सिंह
निशू सिंह
गुलशन कश्यप, प्रतिनिधी
जमुई : व्यक्ती जेव्हा एखादे ध्येय ठरवतो, ते पूर्ण करत असताना अनेक संकांटांचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही काही जण असे असतात जे जिद्दीने, मेहनतीने, हार न मानता आपले ध्येय पूर्ण करतात. आज अशाच एका तरुणीची अत्यंत प्रेरणादायी अशी कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जिने जगातील सर्वात उंच असलेले माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले.
advertisement
निशु सिंह असे या तरुणीचे नाव आहे. ती गिर्यारोहक आहे आणि आयुष्यात एकदा तरी माऊंट एव्हरेस्ट सर करावे, असे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. पण हे अत्यंत अवघड आहे, त्यामुळे ते सर करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. मात्र, निशू सिंह या भारत मातेच्या कन्येने हे शक्य करुन दाखवले आहे.
निशु सिंह या बिहारच्या जमुई जिल्ह्यातील मलयपूर येथील रहिवासी आहेत. निशू सिंग यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट जिंकले आहे. निशूने 26 हजार 200 फूट उंच माउंट एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकावला आहे, असे करणाऱ्या त्या जमुईच्या पहिला गिर्यारोहक ठरल्या आहेत.
advertisement
हवामान खराब होते तरी... -
निशू यांनी सांगितले की, त्या चढत असताना अचानक हवामान खराब झाले. वादळ आले आणि बर्फ पडू लागला. त्यामुळे त्यांच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. मात्र, असे असतानाही त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. प्रवासाच्या सुरुवातीला वादळ, बर्फवृष्टी आणि थंड वारे यामुळे चढण खूप अवघड झाली होती. पण सतत 9 तासांच्या चढाईनंतर आम्ही आमच्या चौथ्या कॅम्पवर पोहोचलो.
advertisement
inspiring story : किराणा दुकानदाराच्या मुलाची कमाल, जर्मनीच्या कंपनीकडून मिळालं तब्बल 26 लाख रुपयांचं पॅकेज
यावेळी तिथलं वातावरण चांगलं नव्हतं. म्हणून पहाटे साडे तीन वाजता निघावं लागलं आणि खराब हवामान असतानाही त्यांनी चढाई केली. अशाप्रकारे 26 हजार 200 फूट उंची गाठल्यानंतर निशू यांनी आपल्या देशाचा तिरंगा फडकवला. त्यांच्या या यशानंतर त्यांच्या गावासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
मराठी बातम्या/करिअर/
हवामान खराब, वादळासह बर्फही पडू लागला, पण भारत मातेच्या सुपूत्रीने केली अद्भुत कामगिरी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement