advertisement

"राजकारण लय वंगाळ", अजितदादांचा शब्द खरा ठरला, ज्याच्या प्रवेशाला भाषण ठोकलं, त्याच्यावर जीवघेणा हल्ला

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण-पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला आहे.

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी खेड: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण-पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण तालुक्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आंबेठाण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

भररस्त्यात दबा धरून हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, शरद बुट्टे पाटील हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी आधीच दबा धरून बसत त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, यात बुट्टे पाटील यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement

"राजकारण लय वंगाळ धंदापाणी करा"

शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी काय आठवणीत राहिल असं भाषण केलं होतं. "राजकारण लय वंगाळ आहे, तुम्ही धंदापाणी करा, मस्त राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा" असं अवाहन दादांनी केलं होतं. आता याच शरद बुट्टे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या पत्नी सुनिता बुट्टे यांना पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement

कार्यकर्त्यांचा संताप आणि पोलिसांचा तपास

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालाजी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली. कार्यकर्त्यांकडून या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून, दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हल्लेखोर कोण होते आणि यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"राजकारण लय वंगाळ", अजितदादांचा शब्द खरा ठरला, ज्याच्या प्रवेशाला भाषण ठोकलं, त्याच्यावर जीवघेणा हल्ला
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement