advertisement

पडक्या इमारतीत नेलं; तोंडात रूमाल कोंबून 75 वर्षीय आजीवर अत्याचार, पुण्याला हादरवणाऱ्या त्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल

Last Updated:

पीडित ७५ वर्षीय महिला आजारी होती. याचाच फायदा घेत आरोपीने त्यांना दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने नेले.

वृद्ध महिलेवर अत्याचार (AI Image)
वृद्ध महिलेवर अत्याचार (AI Image)
पुणे: नात्यातील विश्वासाला तडा देत आजारी ज्येष्ठ महिलेवर अत्याचार करणाऱ्या ५८ वर्षीय नराधमाला पुणे न्यायालयाने कठोर धडा शिकवला आहे. ७५ वर्षीय पीडित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी सुनावली आहे.
काय आहे संतापजनक घटना?
ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती. पीडित ७५ वर्षीय महिला आजारी होती. याचाच फायदा घेत आरोपीने त्यांना दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने नेले. मात्र, परत येत असताना त्याने माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. आरोपीने पीडितेला एका अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी नेले. तिथे त्यांना जमिनीवर पाडून, तोंडात रुमाल कोंबला जेणेकरून त्या ओरडू शकणार नाहीत आणि त्यांच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
advertisement
वैद्यकीय पुरावा ठरला महत्त्वाचा
अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला धमकावून तिथून पळ काढला. मात्र, पीडितेने हिंमत हारली नाही. त्यांनी पायी घर गाठले आणि मुलाला सोबत घेऊन पौड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. झटापटीत पीडितेच्या अंगावर झालेल्या जखमा आणि वैद्यकीय तपासणीचा अहवाल या खटल्यात सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला. विशेष सरकारी वकील संजय पवार यांनी ८ साक्षीदार तपासले आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.
advertisement
न्यायालयाचे परखड निरीक्षण
आरोपीने सध्याचे आपले वय (६५ वर्षे) आणि कुटुंबाची जबाबदारी असल्याचे सांगत दयेची याचना केली होती. मात्र, न्यायालयाने त्याचे हे दावे फेटाळून लावले. "आरोपीने ७५ वर्षीय आजारी महिलेबाबत केलेली कृती हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे," असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला १० वर्षे कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पडक्या इमारतीत नेलं; तोंडात रूमाल कोंबून 75 वर्षीय आजीवर अत्याचार, पुण्याला हादरवणाऱ्या त्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement