Vastu tips : घरात या दिशेलाच का लावले जातात पूर्वजांचे फोटो, ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे

Last Updated:

घरात पूर्वजांचे फोटो ठेवण्याची सुद्धा एक दिशा ठरलेली आहे. योग्य दिशेत हे फोटो ठेवले नाही तर घरातील सुख शांती तर जातेच. मात्र, अनेक वाद विवाद घरात होतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
ऋतू राज, प्रतिनिधी
मुजफ्फरपुर : प्रत्येकाच्या घरात पूर्वजांचे फोटो ठेवलेले असतात. असे मानले जाते की, घरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने सुख-समृद्धी येते. तसेच पूर्वजांचा आशिर्वाद मिळतो. या कारणामुळे पूर्वजांचा फोटो काही लोक लिव्हींग रुममध्ये ठेवतात. तर काही लोकं त्याला बेडरुम किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवतात.
अशाप्रकारे लोक पूर्वजांची नियमित रुपाने आठवण करत असतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का घरात पूर्वजांचे फोटो ठेवण्याची सुद्धा एक दिशा ठरलेली आहे. योग्य दिशेत हे फोटो ठेवले नाही तर घरातील सुख शांती तर जातेच. मात्र, अनेक वाद विवाद घरात होतात. त्यामुळे ज्योतिष सल्लागार आलोक कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
हवामान खराब, वादळासह बर्फही पडू लागला, पण भारत मातेच्या सुपूत्रीने केली अद्भुत कामगिरी
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवत असाल तर ते नेहमी फ्रेम करून शेल्फ किंवा कपाटात ठेवावेत, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल. कारण, पूर्वजांचे फोटो कधीही भिंतीवर टांगले तर पितरांचा अपमान होतो. त्यांचे आशीर्वाद मिळत नाहीत. उलट पितृदोषही होतो, असे मानले जाते.
advertisement
जिवंत व्यक्तीसोबत मृत व्यक्तीचा फोटो लावावा -
ज्योतिषी सल्लागार आलोक कुमार यांनी सांगितले की, आपल्या पूर्वजांचे फोटो घरात लावताना आपण एकाच पूर्वजांचे अनेक फोटो घरात वेगवेगळ्या ठिकाणी लावतो. मात्र, एकाच पूर्वजाचे फोटो हे एकापेक्षा जास्त वेळा लावू नये. असे केल्याने पितरांना राग येतो आणि घरात कलह सुरू होतो.
मोठी बातमी! अयोध्येत इकबाल अन्सारी यांनी नरेंद्र मोदींसाठी अल्लाहकडे मागितली दुवा, म्हणाले...
यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे घराच्या ब्रह्म स्थानावर किंवा घराच्या मध्यभागी पितरांचे फोटो कधीही लावू नयेत. कारण त्यामुळे मानहानी होण्याची शक्यता वाढते. तसेच जिवंत लोकांच्या फोटोंसोबत, मृत व्यक्तींचे फोटो कधीही लावू नये, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu tips : घरात या दिशेलाच का लावले जातात पूर्वजांचे फोटो, ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement