advertisement

हिवाळ्यात वाढतंय वजन, तर या फळाचे करा सेवन, आहेत खूपच फायदे

Last Updated:

रिवाच्या प्रत्येक रस्त्यावर चौकात तुम्हाला लोक शिंगाड्याची विक्री करताना दिसतील. तसेच याठिकाणाहून हे शिंगाडे इतर ठिकाणीही विक्रीसाठी पाठवले जातात.

बाजारातील दृश्य
बाजारातील दृश्य
आशुतोष तिवारी, प्रतिनिधी
रीवा, 6 डिसेंबर : थंडी वाढल्यावर लोकांचे खानपानही हेवी होते. अशावेळी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेस करावा आणि आपली फिटनेस कायम ठेवावी, हे गरजेचे आहे. यासाठी शिंगाडे हे फार फायदेशीर सिद्ध होऊ शकतात. शिंगाडे खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदा होता. तसेच अनेक रोगांवर लढण्यासाठी हे फायदेशीर आहे.
धन्वंतरी क्षमा नैसर्गिक वन औषधी योगांजली आरोग्य केंद्र रीवाशी संबंधित वैद्य एलएम मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शिंगाडे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या फळामध्ये पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. हे फळ खाल्ल्याने पोट सहज भरते.
advertisement
शिंगाडे खाल्ल्याने परत परत भूक नाही लागत. तसेच व्यक्ती हा ओव्हर इटिंगपासून वाचतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शिंगाडे हे फायदेशीर झाले आहेत. यामुळे पचनही चांगले होते. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी शिंगाडे फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. तसेच केस निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.
मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यात शिंगाडे मिळतात. याठिकाणी शिंगाड्याची चांगली शेती होते. जिल्ह्यात प्रत्येक 10 किमीच्या अंतरावर कुठे ना कुठे एक मोठा तलाव आहे, ज्याठिकाणी शिंगाड्याची शेती होते. रिवाच्या प्रत्येक रस्त्यावर चौकात तुम्हाला लोक शिंगाड्याची विक्री करताना दिसतील. तसेच याठिकाणाहून हे शिंगाडे इतर ठिकाणीही विक्रीसाठी पाठवले जातात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हिवाळ्यात वाढतंय वजन, तर या फळाचे करा सेवन, आहेत खूपच फायदे
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement