अतिशय युनिक औषधी वनस्पती! फक्त वास घेतला तरी बरे होतात अनेक आजार

Last Updated:

रोझमेरी एक आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.

News18
News18
आशिष त्यागी
बागपत: पारंपरिक भारतीय वनौषधी आपल्याला घरातल्या बुजुर्गांकडून माहिती होतात. पूर्वी आजीबाईच्या बटव्यात अशी खूप घरगुती औषधे सापडत असत. आता जुन्या काळातील आजी आणि तिचा बटवाही गेला. पण त्याचबरोबर इंटरनेटने जगभरातल्या वनौषधींची कवाडे आपल्यासाठी उघडली. पूर्वी कधी न ऐकलेल्या औषधी वनस्पती आता आपण आपल्यया टेरेस गार्डनमध्ये उगवायला लागतो आणि आयुर्वेदित तज्ज्ञही नियमित त्यांचा वापर करू लागले. अशीच एक इंग्रजी नावाची आयुर्वेदिक वनौषधी म्हणजे Rosemary.
advertisement
रोझमेरी एक आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. रोझमेरीच्या सुक्या फांद्या, पाने आणि बिया बाजारात सहज उपलब्ध आहेत.  उत्तर प्रदेशात खेकरा येथे आयुर्वेदिक दवाखाना चालवणारे डॉ.सरफराज म्हणाले की, रोझमेरीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात.
फ्लेव्होनॉइड्स, डायटरपेन्स, पॉलिफेनॉल आणि इतर अनेक प्रभावी घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, रोझमेरी केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करते. रोझमेरी एक विशेष प्रकारचा सुगंध देते, ज्यामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते आणि तुमची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारते. रोझमेरी वनस्पतीचे वाळलेले भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात, जे शरीरातील अनेक प्रकारच्या वेदनांपासून आराम देण्यास मदत करतात. रोझमेरी हुंगल्यानेसुद्धा खूप फायदा होतो. याच्या सुगंधाने तणाव नाहीसा होतो. स्ट्रेसबरोबर डिप्रेशनसारख्या विकारांची पातळी कमी होते. रोझमेरीचा सुगंध कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी करतो.
advertisement
कसे वापरायचे?
आपण रोझमेरीची वाफ घेऊ शकतो किंवा सुगंध इनहेल करून वापरू शकतो. रोझमेरीचा वापर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच करावा. रोझमेरीचा वापर योग्य प्रमाणातच करावा. अति वापरामुळे त्वचेची ऍलर्जी, डोकेदुखी, पोटदुखी होऊ शकते.
Disclaimer: या बातमीत दिलेले औषध/औषधे आणि आरोग्यविषयक सल्ले तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. अशा कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अतिशय युनिक औषधी वनस्पती! फक्त वास घेतला तरी बरे होतात अनेक आजार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement