IRCTC South India Tour: दक्षिण भारताचे सौंदर्य अनुभवण्याची उत्तम संधी! आयआरसीटीसीचं खास टूर पॅकेज लॉन्च
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
IRCTC Christmas Special South India Tour : तुम्ही ख्रीसमसच्या सुट्टीत कुठे जाण्याचा प्लॅन आखत असाल तर दक्षिण भारत तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण ठरू शकते. डिसेंबर हा दक्षिण भारताला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे. त्यामुळेच आयआरसीटीसीने एक खास टूर पॅकेज सुरू केले आहे. या 5 रात्री आणि 6 दिवसांच्या पॅकेजमध्ये तुम्हाला दक्षिण भारतातील अनेक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळते.
मुंबई : आयआरसीटीसीकडून दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि निसर्गरम्य ठिकाणांचा अनुभव देणारे विशेष टूर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रम या ठिकाणांचा समावेश असलेले हे पॅकेज अध्यात्म, इतिहास आणि समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य एकाच प्रवासात अनुभवण्याची संधी देते. परवडणाऱ्या दरात अनेक सुविधा हे या पॅकेजचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
किती दिवसांचे आहे पॅकेज?
हे पॅकेज एकूण 5 रात्री आणि 6 दिवसांचे असून SOUTH INDIA TOUR (WMA47B) असे या पॅकेजचे नाव आहे. य पॅकेजसाठी प्रवासाची तारीख 24 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. मुंबईहून सुरू होणारा हा टूर इंडिगो विमानसेवेने पार पडणार असून भोजन व्यवस्थेमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. प्रवासादरम्यान पर्यटकांना आरामदायी आणि नियोजनबद्ध अनुभव देण्यावर आयआरसीटीसीने भर दिला आहे.
advertisement
कसा असेल संपूर्ण प्रवास?
प्रवासाची सुरुवात 24 डिसेंबर रोजी दुपारी 13:50 वाजता मुंबईहून मदुराईकडे उड्डाणाने होते आणि 16:00 वाजता मदुराई विमानतळावर आगमन होते. त्यानंतर संपूर्ण टूरदरम्यान सर्व ठिकाणांची भेट रोडमार्गे एसी कोचद्वारे घडवून आणली जाते. परतीचा प्रवास 29 डिसेंबर रोजी दुपारी 12:05 वाजता त्रिवेंद्रमहून सुरू होऊन 14:25 वाजता मुंबईत समाप्त होतो.
advertisement
काय काय पाहता येणार?
या टूरमध्ये अनेक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळते. मदुराई येथे मीनाक्षी अम्मन मंदिर, रामेश्वरम येथे रामनाथस्वामी मंदिर, धनुष्कोडी आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मारक, कन्याकुमारी येथे कुमारी अम्मन मंदिर, सूर्योदय व सूर्यास्त दर्शन, विवेकानंद रॉक मेमोरियल आणि गांधी मंडपम पाहता येतात. तसेच त्रिवेंद्रममध्ये पद्मनाभस्वामी मंदिर, नॅपियर म्युझियम आणि कोवलम बीच या ठिकाणांना भेट दिली जाते.
advertisement
पॅकेजचा प्रतिव्यक्ती खर्च
या पॅकेजचा प्रतिव्यक्ती खर्च विविध ऑक्युपन्सीनुसार निश्चित करण्यात आला आहे. सिंगल ऑक्युपन्सीसाठी 62,610 रुपये, डबल ऑक्युपन्सीसाठी 49,800 रुपये, तर अतिरिक्त बेडसह ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी 47,200 रुपये इतका खर्च आहे. 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी बेडसह 41,000 रुपये, बेडशिवाय 38,400 रुपये, तर 2 ते 4 वयोगटातील मुलांसाठी 27,700 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
पॅकेजमध्ये काय काय समाविष्ट असेल?
या टूर पॅकेजमध्ये मुंबई ते मदुराई आणि त्रिवेंद्रम ते मुंबई रिटर्न विमानप्रवास, सर्व ट्रान्सफर आणि साईटसीईंगसाठी एसी कोच सुविधा, 3 स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, नाश्ता व रात्रीचे जेवण, प्रवास आराखड्यानुसार सर्व दर्शन स्थळांची प्रवेश तिकीटे, प्रवास विमा आणि जीएसटी यांचा समावेश आहे. मात्र विमानभाड्यात किंवा करांमध्ये झालेली वाढ, वैयक्तिक खर्च, रूम सर्व्हिस तसेच नियोजित यादीत नसलेल्या बाबी पॅकेजमध्ये समाविष्ट नाहीत.
advertisement
पॅकेज कसे बुक कराल?
या टूरचे बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन कार्यालयांमार्फत करता येते. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील आयआरसीटीसी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधता येईल. तसेच Sweta5601@irctc.com या ई-मेल आयडीवर किंवा 8287931886 या क्रमांकावर कॉल, एसएमएस अथवा व्हॉट्सअॅपद्वारेही सविस्तर माहिती आणि बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 9:38 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
IRCTC South India Tour: दक्षिण भारताचे सौंदर्य अनुभवण्याची उत्तम संधी! आयआरसीटीसीचं खास टूर पॅकेज लॉन्च











