IRCTC Shirdi Aurangabad Tour : तीर्थाटनासोबत पर्यटनाची संधी! शिर्डी आणि औरंगाबादसाठी आयआयसीटीसीचं खास वंदे भारत टूर पॅकेज
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
IRCTC Shirdi And Aurangabad Tour : आयआरसीटीसीने मुंबईहून भक्ती आणि इतिहासाचा संगम असलेले एक खास टूर पॅकेज लॉन्च केले आहे. शिर्डी हे साई बाबाचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, तर छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे.
मुंबई : आयआरसीटीसीच्या वंदे भारत ट्रेनमधून कन्फर्म तिकिटांसह शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रवास करण्याची सुवर्ण संधी आहे. आयआरसीटीसीने मुंबईहून भक्ती आणि इतिहासाचा संगम असलेले एक खास टूर पॅकेज लॉन्च केले आहे. शिर्डी हे साई बाबाचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, तर छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. येथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर दर्शनासोबत ऐतिहासिक वारसा असलेली वेळी लेणी पाहता येणार आहे.
साईभक्तांसाठी आणि ज्योतिर्लिंग दर्शनाची इच्छा असणाऱ्यांसाठी आयआरसीटीसीने मुंबईहून खास Shirdi with Aurangabad Ex-Mumbai (WMR173) हे रेल्वे टूर पॅकेज सुरू केले आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या कन्फर्म तिकिटांसह उपलब्ध असलेल्या पॅकेजमध्ये प्रवाशांना अतिशय कमी वेळेत भक्ती, इतिहास आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळतो.
या टूर पॅकेजमध्ये शिर्डी आणि औरंगाबाद या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. शिर्डी हे साईबाबांचे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते, तर औरंगाबादजवळील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. यासोबतच जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ (एलोरा) लेणी पाहण्याची संधीही या टूरमध्ये मिळते.
advertisement
किती दिवसांचे आहे पॅकेज?
हे पॅकेज एकूण 1 रात्र आणि 2 दिवसांचे आहे. प्रवासाची रूपरेषा मुंबई – शिर्डी – औरंगाबाद – मुंबई अशी असून हे टूर पॅकेज दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी उपलब्ध आहे. प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेसमधील कार चेअर (CC) आणि एक्झिकेटिव्ह कार चेअर (EC) वर्गाची सुविधा देण्यात आली आहे.
advertisement
कसा असेल संपूर्ण प्रवास?
प्रवासाची सुरुवात पहिल्या दिवशी सकाळी 06:20 वाजता मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरून वंदे भारत ट्रेन क्रमांक 22223 ने होते. सकाळी 11:40 वाजता शिर्डी येथे आगमन होते. दुसऱ्या दिवशी शिर्डीहून औरंगाबादमार्गे दर्शन घेऊन सायंकाळी 17:25 वाजता वंदे भारत ट्रेन क्रमांक 22224 ने परतीचा प्रवास सुरू होतो आणि रात्री 22:50 वाजता मुंबईत आगमन होते.
advertisement
काय काय पाहता येणार?
या टूरमध्ये भाविकांना शिर्डी साईबाबा मंदिराचे दर्शन घेता येते. त्यानंतर औरंगाबाद येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि एलोरा लेणी या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट दिली जाते. भक्ती आणि इतिहास यांचा संगम या प्रवासात अनुभवता येतो.
पॅकेजचा प्रतिव्यक्ती खर्च
या टूरसाठी प्रतिव्यक्ती खर्च क्षेणीनुसार वेगवेगळा आहे. कार चेअरसाठी (CC) सिंगल शेअरिंगमध्ये प्रतिव्यक्ती 13999 रुपये, डबल शेअरिंगमध्ये प्रतिव्यक्ती 8599 आणि ट्रिपल शेअरिंगमध्ये प्रतिव्यक्ती 7499 रुपये खर्च आहे. याशिवाय 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी बेडसह 6799 रुपये आणि बेडशिवाय 5799 रुपये इतका खर्च आहे.
advertisement
याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह कार चेअरसाठी (EC) सिंगल शेअरिंगमध्ये 16450 रुपये, डबल शेअरिंगमध्ये 11050 रुपये आणि ट्रिपल शेअरिंगमध्ये 9950 रुपये खर्य येईल. याशिवाय मुलांसाठी बेडसह 9350 रुपये आणि बेडशिवाय 8350 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.
पॅकेजमध्ये काय काय समाविष्ट असेल?
या पॅकेजमध्ये मुंबई ते शिर्डी आणि परतीचा वंदे भारत रेल्वे प्रवास, शिर्डी येथे हॉटेल मुक्काम, पहिल्या दिवशी शिर्डी रेल्वे स्थानक ते हॉटेल ट्रान्सफर, दुसऱ्या दिवशी शिर्डी–औरंगाबाद–शिर्डी प्रवास, 1 नाश्ता आणि 1 रात्रीचे जेवण, प्रवास विमा आणि जीएसटी यांचा समावेश आहे.
advertisement
पॅकेज कसे बुक कराल?
या टूरचे बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन कार्यालयांमार्फत करता येते. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथील आयआरसीटीसी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधता येईल. तसेच
pallaviv.pole@irctc.com / deowzt10@irctc.com या ईमेलवर किंवा 8287931886 या क्रमांकावर कॉल, एसएमएस किंवा अथवा व्हॉट्सअॅपद्वारेही सविस्तर माहिती आणि बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
IRCTC Shirdi Aurangabad Tour : तीर्थाटनासोबत पर्यटनाची संधी! शिर्डी आणि औरंगाबादसाठी आयआयसीटीसीचं खास वंदे भारत टूर पॅकेज








