Lemon Crush Pickle Recipe : दररोजच्या जेवणात चटकदार खायला हवंय? सोप्या पद्धतीने बनवा लिंबू क्रश लोणचे, रेसिपीचा Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कैरीचे लोणचे, गाजर आणि मिरचीचे लोणचे तसेच लिंबूचे लोणचे अनेकांच्या आवडीचे असते. त्यातीलच लिंबू क्रश लोणचे हे चटकदार आणि बनवायला सोपे असल्याने प्रत्येकजण त्यावर ताव मारतात.
अमरावती : दररोजच्या जेवणात काहीतरी चटकदार असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. चटकदार म्हटलं की, प्रत्येकाला लोणचे आठवते. कैरीचे लोणचे, गाजर आणि मिरचीचे लोणचे तसेच लिंबाचे लोणचे अनेकांच्या आवडीचे असते. त्यातीलच लिंबू क्रश लोणचे हे चटकदार आणि बनवायला सोपे असल्याने प्रत्येकजण त्यावर ताव मारतात. प्रत्येकाची लोणचे बनविण्याची पद्धत वेगवेगळी असते. अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी असे लिंबाचे लोणचे कसे बनवायचे? त्याची रेसिपी जाणून घेऊया.
लिंबू क्रश लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 किलो लिंबू, अर्धा किलो साखर, मीठ, लाल तिखट आणि जिरे पूड, हे सर्व साहित्य तुम्हाला पाहिजे त्या चवीनुसार घ्यायचं आहे.
लिंबू क्रश लोणचे बनविण्याची कृती
सर्वात आधी लिंबाचे काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया राहिल्यास लोणचे कडू होण्याची शक्यता असते. नंतर काप केलेले लिंबू आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. लिंबाची खूप बारीक पेस्ट करायची नाही. थोडे बारीक काप त्यात राहायला पाहिजेत. नंतर लोणचे बनविण्यासाठी स्टीलचे भांडे घ्यायचे आहे. लोणचे बनविण्यासाठी लोखंड किंवा जर्मन वापरू शकत नाही. त्यात लोणचे अधिक आंबट होते. त्यामुळे स्टीलचे भांडे घ्यायचे आहे.
advertisement
भांडे गॅसवर ठेवल्यानंतर त्यात लिंबाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. लगेच त्यात जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झालं की, साखर टाकून घ्यायची आहे. साखरेऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता. साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नंतर साखरेला व्यवस्थित पाक येऊ द्यायचा आहे. मध्यम आचेवर हे लोणचे तयार करायचे आहे. कमीतकमी 20 मिनिटे पाक येण्यासाठी लागतात.
advertisement
नंतर पाक जाडसर झाला आणि छान कलर आला की लोणचे तयार झालेले असेल. नंतर 1 तास हे थंड होऊ द्यायचे आहे. त्यासाठी यावर कापड झाकून ठेवू शकता. 1 तासानंतर लोणचे छान तयार झाले असेल. आता हे तुम्ही काचेच्या भांड्यात साठवून ठेवू शकता. आरामात हे लोणचे वर्षभर टिकते. चवीला अतिशय टेस्टी असे चटपटीत लोणचे तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Nov 05, 2025 3:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Lemon Crush Pickle Recipe : दररोजच्या जेवणात चटकदार खायला हवंय? सोप्या पद्धतीने बनवा लिंबू क्रश लोणचे, रेसिपीचा Video







