श्वास घ्यायला त्रास, छातीत कफ भरला, शरद पवारांचा हॉस्पिटलमधील पहिला VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शरद पवार हे आज सकाळी बारामतीतील गोविंद बागेत आपल्या निवासस्थानी होते. त्यांची अचानक तब्येत बिघडली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शरद पवार हे आज सकाळी बारामतीतील गोविंद बागेत आपल्या निवासस्थानी होते. त्यांची अचानक तब्येत बिघडली. यानंतर शरद पवारांना तातडीने पुण्यात आणण्यात आलं. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवार यांना आज सकाळपासून श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. छातीत कफ भरल्याने आणि खोकल्यामुळे त्यांना हा त्रास जाणवत होता, अशी माहिती समोर आली आहे. हा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी तातडीने पुण्यात आणलं आहे. येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. शरद पवार यांना सिटीस्कॅन करण्यासाठी आतमध्ये घेऊन गेले. डॅाक्टर अभिजीत लोढा यांच्यावर उपचार करत आहेत.
advertisement
आता शरद पवार यांचा रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात शरद पवार एका स्ट्रेचरवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या तोंडाला ऑक्सीजन मास्क लावल्याचं दिसत आहे. त्यांना सिटीस्कॅन साठी घेऊन जाताना रुग्णालयातील काही उपस्थित लोकांनी हा व्हिडीओ काढला आहे. हॉस्पिटलमधील दृश्यांचा हा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये चिंतेंचं वातावरण पसरलं आहे.
advertisement
सातत्याने लोकांच्या संपर्कात आल्याने आणि वातावरणातील बदलांमुळे शरद पवार यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे. याच मुळे त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. आज एक दिवस शरद पवार यांना रुग्णालयात ऍडमिट केलं जाण्याची शक्यता असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
खरं तर, २८ जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यापासून शरद पवार हे बारामतीत ठाण मांडून बसले होते. ते पवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत अनेक बैठका घेत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यांना सोबत घेऊन ते बैठका घेत होते. बैठकांचा सिलसिला सुरू असताना आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 4:40 PM IST









