Mango Sheera Recipe: खाण्यासाठी अतिशय टेस्टी, आंब्याचा शिरा घरीच कसा बनवायचा? रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आंब्याचा रस, रवा, तूप आणि साखर वापरून हा पदार्थ बनवला जातो. खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागणारा हा पदार्थ घरच्या घरी बनवता येऊ शकतो.
अमरावती: आंब्याच्या सिझनमध्ये त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गोड आणि रसाळ आंबा वापरून बनवलेले पदार्थ खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे आंब्याचा शिरा. आंब्याचा रस, रवा, तूप आणि साखर वापरून हा पदार्थ बनवला जातो. खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागणारा हा पदार्थ घरच्या घरी कसा बनवायचा? त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी सारिका पापडकर यांनी दिली आहे.
आंब्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी दूध हे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहे. तूप, खोबरे किस आणि ड्रायफ्रूट्स हे साहित्य लागेल.
advertisement
आंब्याचा शिरा बनवण्याची कृती
सर्वात आधी रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईत तूप टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात रवा टाकून घ्या. रवा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजला की शिरा आणखी टेस्टी लागतो. रवा भाजून झाल्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे आहे.
advertisement
तोपर्यंत रव्यामध्ये दूध टाकून घ्यायचे आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यावर त्यात थोडे गरम पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी टाकल्यानंतर रवा त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यासाठी जाड रवा वापरावा लागतो. त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. बारीक रवा असल्यास त्याच्या गुठळ्या तयार होतात.
advertisement
ते मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात साखर आणि आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे. ते सुद्धा मिक्स करायचे आहे. त्यानंतर शिरा 10 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटांनंतर शिरा तयार झालेला असेल. त्यात तुम्ही लागत असल्यास आणखी तूप टाकून घेऊ शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट्स, खोबरे किस टाकून घेतले की शिरा खाण्यासाठी तयार होतो. सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 13, 2025 12:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Mango Sheera Recipe: खाण्यासाठी अतिशय टेस्टी, आंब्याचा शिरा घरीच कसा बनवायचा? रेसिपीचा Video