Chai Recipe : सोशल मीडियावर Viral झाला भाजलेला चहा; याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत एकदा Video मध्ये पाहाच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक जण नेहमीच्या चहातील साखरेमुळे आणि दुधामुळे होणाऱ्या ॲसिडिटीला कंटाळले आहेत. त्यामुळे लोकांची अशी अवस्था झाली आहे की चहा सोडू शकत नाही आणि चहा प्यायली तर ऍसिडिटी होते. मग आता करायचं काय?
मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करत असतील, पण भारतात 'चहा' (Tea) शिवाय सकाळ सुरू होऊ शकत नाही. 'चहा' हे पेय आपल्यासाठी फक्त एक पेय नाही, ती एक सवय आहे, एक परंपरा आहे आणि एक भावना आहे. भारतीयांसाठी चहा म्हणजे फक्त दूध, साखर आणि चहापत्तीचे मिश्रण नाही. तो एक घरगुती उपाय आहे, जो मूड ठीक करतो आणि थकवा दूर पळवतो.
पण, आजकालच्या आरोग्य-जागरूक (Health Conscious) युगात, अनेक जण नेहमीच्या चहातील साखरेमुळे आणि दुधामुळे होणाऱ्या ॲसिडिटीला कंटाळले आहेत. त्यामुळे लोकांची अशी अवस्था झाली आहे की चहा सोडू शकत नाही आणि चहा प्यायली तर ऍसिडिटी होते. मग आता करायचं काय?
तर चहा बनवण्याची पद्धत थोडी बदलली तर तुम्ही अशी हेल्दी चहा बनवू शकता की त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही आणि शिवाय ती चहा वजन कमी करण्यात देखील मदत करेल. यासाठी चहा बनवण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडिययावर समोर आला आहे.
advertisement
Instagram वरील या व्हिडीओत बनवलेल्या चहाच्या पद्धतीने वजन कमी करण्यासाठी आणि पोटातील ॲसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर असल्याचा दावा केला गेला आहे. ही पद्धत म्हणजे भाजलेली चहा पावडर आणि गूळ वापरून चहा बनवणे.
भाजलेल्या चहा पावडरचे रहस्य
हा खास चहा बनवण्यासाठी वापरलेली पद्धत खूप सोपी आहे, पण त्याचे फायदे विशेष आहेत.
advertisement
चहा पावडर भाजणे, आधी चहा पावडर (Tea Powder) एका पॅनमध्ये घेऊन हलकी भाजून घ्या.
त्यानंतर चवीनुसार गूळ (साखर नव्हे) घाला. गूळ थोडं वितळलं की त्यात अर्धा कप गरम दूध आणि अर्धा कप पाणी (म्हणजे समान प्रमाणात) घ्या. उकळी आल्यावर हे मिश्रण आणखी अर्धा मिनिट स्लो गॅसवर उकळून घ्या. चहा गाळून गरम असतानाच सर्व्ह करा.
advertisement
वजन कमी करणे आणि ॲसिडिटीवर फायदा
भाजलेल्या चहाच्या या रेसिपीचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे सांगितले जातात.
advertisement
वजन नियंत्रणात मदत
या चहामध्ये साखरेऐवजी गूळ वापरला जातो. गूळामध्ये साखरेपेक्षा कमी कॅलरी असतात आणि तो नैसर्गिक गोडवा देतो. तसेच, गूळ पचनासाठी मदत करतो.
चहा पावडर भाजल्याने तिच्यातील नैसर्गिक तेल अधिक प्रभावी होतात, जे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. चांगले मेटाबॉलिझम वजन कमी करण्यास हातभार लावते.
ॲसिडिटीवर नियंत्रण :
सामान्य चहा बनवताना चहापत्ती जास्त उकळल्यास, त्यात टॅनिन नावाचे घटक वाढतात, ज्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते.
advertisement
भाजलेल्या चहा पावडरच्या या रेसिपीमध्ये चहा पावडरचा कडवटपणा कमी होतो. तसेच, गूळ हा अल्कधर्मी (Alkaline) असतो, ज्यामुळे तो पोटातील ॲसिड संतुलित ठेवण्यास मदत करतो. यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.
जर तुम्ही चहाप्रेमी असाल आणि वजन कमी करण्याचा किंवा ॲसिडिटी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर हा भाजलेल्या चहा पावडरचा प्रयोग नक्कीच करून पाहावा. साधे घटक वापरून बनवलेला हा चहा तुमच्या रोजच्या सवयीत एक आरोग्यदायी बदल घडवू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 4:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Chai Recipe : सोशल मीडियावर Viral झाला भाजलेला चहा; याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत एकदा Video मध्ये पाहाच










