थंडीचा कडाका अन् चहा प्यायचा नाही? मग घरीच बनवा कॅफे स्टाईल 'हॉट चॉकलेट', पाहा रेसिपी Video
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Winter Recipe: हिवाळ्यात अनेकजण कॅफेत जाऊन आवडीनं हॉट चॉकलेट पितात. पण हीच हेल्दी रेसिपी तुम्ही अगदी घरी देखील बनवू शकता.
छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्यामध्ये आपण सर्वांना छान गरम खाण्याची किंवा पिण्याची इच्छा असते. हिवाळ्यामध्ये अनेक जण कॅफेमध्ये जाऊन छान असं हॉट चॉकलेट पितात. पण आपल्याला नेहमी कॅफेमध्ये किंवा बाहेर जाऊन असं हॉट चॉकलेट पिणं शक्य होत नाही. तेव्हा अगदी कॅफेस्टाईल हॉट चॉकलेट तेही साखरेशिवाय आपण घरी देखील बनवू शकतो. छत्रपती संभाजीनगरमधील ऋतुजा पाटील यांनी हीच रेसिपी सांगितली आहे.
हॉट चॉकलेटसाठी लागणारे साहित्य
पाच ते सहा खजूर, दालचिनी पावडर, दोन चमचे कोको पावडर, तीन ते चार चमचे डार्क चॉकलेट, दूध एवढेच यासाठी साहित्य लागणार आहे.
हॉट चॉकलेट करण्याची कृती
सगळ्यात पहिले खजूर अर्धा कप दुधामध्ये पाच ते दहा मिनिटांसाठी भिजत घालायचे. दहा मिनिटानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. एका चहाच्या भांड्यामध्ये तयार केलेलं खजुराचं मिश्रण टाकायचं. त्यामध्ये एक मोठा कप दूध टाकायचं आणि त्यामध्ये दोन चमचे कोको पावडर, दालचिनीची पावडर टाकायची. (दालचिनी पावडर एकदम ऑप्शनल आहे.)
advertisement
आपण डार्क चॉकलेट घेतलेलं आहे ते देखील यामध्ये टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं. त्याला साधारण उकळी येऊ द्यायची आणि घट्टसर होऊ द्यायचं. मिक्स्चर घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. त्यानंतर एका कपमध्ये आपण तयार केलेले हॉट चॉकलेट आणि त्यावरून बारीक किसून चॉकलेट टाकायचं. अशा पद्धतीनं आपली अगदी कॅफेस्टाईल हॉट चॉकलेट रेसिपी तयार होते. तुम्ही देखील ही सोपी आणि हेल्दी रेसिपी आपल्या घरीच ट्राय करू शकता.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 2:14 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
थंडीचा कडाका अन् चहा प्यायचा नाही? मग घरीच बनवा कॅफे स्टाईल 'हॉट चॉकलेट', पाहा रेसिपी Video









