मेथीची भाजी किती दिवस खाणार? आता नाश्त्यासाठी बनवा खमंग मेथी पुरी, रेसिपीचा सोप्पा Video

Last Updated:

मेथीची भाजी, पराठे, मेथी सूप खाऊन कंटाळा आला असेल तर खमंग आणि कुरकुरीत मेथी पुरी तुम्ही बनवू शकतात.

+
खमंग

खमंग आणि कुरकुरीत मेथी पुरी 

ठाणे : लहान मुलांना किंवा घरातील इतर सदस्यांना मेथीची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल. त्यातच हिवाळा म्हटले की मार्केटमध्ये सहज मिळणारी पालेभाजी म्हणजे मेथी. मेथीची भाजी, पराठे, मेथी सूप खाऊन कंटाळा आला असेल तर खमंग आणि कुरकुरीत मेथी पुरी तुम्ही बनवू शकतात. ही मेथी पुरी सर्वच जण आवडीने खातील.
साहित्य आणि कृती
मुख्य: गव्हाचे पीठ (२ कप), ताजी मेथी (१ जुडी, बारीक चिरलेली).
पिठासाठी: बेसन (२ चमचे), बाजरी पीठ (१/२ कप, ऐच्छिक).
मसाले: हळद (१/२ चमचा), तिखट (१ चमचा), जिरे (१ चमचा), ओवा (१/२ चमचा), तीळ (१ चमचा), हिंग, मीठ चवीनुसार.
वाटणासाठी: लसूण (५-६ पाकळ्या), हिरवी मिरची (४-५), आले (१/२ इंच), तेल आवश्यकतेनुसार (तळण्यासाठी).
advertisement
कृती: वाटण तयार करणे: मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची, आले, जिरे, धणे (असल्यास), थोडे पाणी घालून बारीक वाटण तयार करा.
कणिक मळणे: एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, बाजरी पीठ (असल्यास), बारीक चिरलेली मेथी, तयार वाटण, हळद, तिखट, जिरे, ओवा, तीळ, हिंग आणि मीठ घ्या. त्यात १ चमचा तेल घाला.
advertisement
कणिक मळून घेणे: सर्व साहित्य चांगले मिक्स करा. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या. कणिक मळताना पाणी जपून वापरा, कारण मेथीमध्ये आधीच ओलावा असतो.
पुरी लाटणे: मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करा. पुरी लाटताना जास्त जाड किंवा पातळ लाटू नका, मध्यम आकाराची पुरी लाटा.
तळणे: गरम तेलात मध्यम आचेवर पुरी सोनेरी रंगाची आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या. तळताना पुरी फुगण्यासाठी हलके दाबा.
advertisement
टिप्स:
१. पुरी जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडे बाजरी पीठ किंवा ज्वारीचे पीठ मिसळू शकता.
२. हे पदार्थ चहासोबत किंवा प्रवासात डब्यात नेण्यासाठी उत्तम आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
मेथीची भाजी किती दिवस खाणार? आता नाश्त्यासाठी बनवा खमंग मेथी पुरी, रेसिपीचा सोप्पा Video
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement