पुणे: आयटी क्षेत्रात तब्बल 29 वर्षांचा अनुभव, लाखो पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आनंद अभ्यंकर यांनी कांदे पोह्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आहे. विप्रो कंपनीत ते मॅनेजर होते. पण स्वतःच काहीतरी करायचं या इच्छेतून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. सध्या त्यांच्या ‘कांदे पोहे आणि बरंच काही’ या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याला तब्बल 3 लाखांची उलाढाल होत आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 17, 2025, 18:35 IST


