Strawberry health benefits: स्ट्रॉबेरीजे फायदे माहिती आहेत का ? अनेक आजारांना पळवून लावेल ‘हे’ इटुकलं फळ
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health benefits of Strawberries in Marathi: स्ट्रॉबेरीजमध्ये भरपूर पोषक तत्त्वे आढळतात ज्यामुळे जीभेचे हट्ट तर पुरवलेच जातातच मात्र त्यासोबतच, शरीरासाठीही स्ट्रॉबेरी फायद्याची ठरते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की स्ट्रॉबेरी खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता येतं.
मुंबई: हिवाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते स्ट्रॉबेरीजचे. स्ट्रॉबेरी ही फक्त दिसायला आणि चवीलाच सुंदर नाहीये. अनेक जण आवडीने स्ट्रॉबेरीज खातात मात्र त्यांना स्ट्रॉबेरीजचे फायदे माहिती नसतील. स्ट्रॉबेरीजमध्ये भरपूर पोषक तत्त्वे आढळतात ज्यामुळे जीभेचे हट्ट तर पुरवलेच जातातच मात्र त्यासोबतच, शरीरासाठीही स्ट्रॉबेरी फायद्याची ठरते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की स्ट्रॉबेरी खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता येतं. महाराष्ट्रात महाबळेश्वरला मिळणारी स्ट्रॉबेरी ही जगप्रसिद्ध आहे. मात्र आता सातारा जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या इतरही जिल्ह्यांमध्ये स्ट्रॉबेरीजचं उत्पादन घेतलं जातंय.
सजावट:
आधी सांगितल्या प्रमाणे स्ट्रॉबेरी दिसायला लालचुटूक आणि चवीला आंबटगोड असते. त्यामुळे अनेकांना ती आवडते. स्ट्रॉबेरीजचा वापर जसा खाण्यासाठी होतो तसाच तो सजावटीसाठी सुद्धा होतो. ज्यूस, मिल्कशेक, डेझर्ट, दही, ओट्स याशिवाय आईस्क्रिम सारख्या इतरही अनेक अनेक गोष्टींवर टॉपिंग्स म्हणून स्ट्रॉबेरीचा वापर होतो.
advertisement
फॅट फ्री:
स्ट्रॉबेरीज गोड जरी असली तरीही त्यात नैसर्गिक साखर असते. याशिवाय स्ट्रॉबेरीत असलेल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखं राहून भूक कमी लागते. स्ट्रॉबेरी हे फॅट फ्री आणि कमी कॅलरीयुक्त फळ आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर स्ट्रॉबेरी खाणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.
रोगप्रतिकारक शक्ती:
स्ट्रॉबेरीजमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ उत्तम प्रमाणात आढळून येतं. यामुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात स्ट्रॉबेरीज खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
advertisement
भरपूर पोषक तत्त्वे:
स्ट्रॉबेरीमध्ये विविध जीवनसत्त्वे, मँगनीज, पोटॅशियम, फायबर्स आणि पॉलिफेनॉलसारखे उत्तम अँटिऑक्सिडंट्स असतात. स्ट्रॉबेरीज या सोडियम फ्री, फॅट फ्री, कोलेस्ट्रॉल फ्री असतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर:
advertisement
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करतात. स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित व्हायला मदत होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी या हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याच्या मानल्या जातात. स्ट्रॉबेरीजच्या नियमित सेवनाने हृदविकारांना दूर ठेवता येतं.
डायबिटीसवर गुणकारी:
ज्यांना डायबिटीस किंवा मधुमेहाचा त्रास आहे अशांना अनेक गोष्टी खाण्यांवर निर्बंध येतात. इतकच काय तर फळं ही शरीरासाठी फायद्याची मानली गेली आहेत. मात्र डायबिटीस असलेल्या व्यक्ती ही फळं सुद्धा खाऊ शकत नाही कारण फळांमधली शर्करा म्हणजेच साखर रक्तात मिसळून डायबिटीस वाढण्याचा धोका असतो. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्ती स्ट्रॉबेरी ही बिनधास्तपणे खाऊ शकतात. स्ट्रॉबेरीचा ग्यायसेमिक इंडेक्स (GI) हा कमी आहे. त्यामुळे रक्तात साखर उशीरा सोडली जाते. याशिवाय स्ट्रॉबेरीत असलेल्या फायबर्समुळे अन्न लवकर पचतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहायला मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2024 5:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Strawberry health benefits: स्ट्रॉबेरीजे फायदे माहिती आहेत का ? अनेक आजारांना पळवून लावेल ‘हे’ इटुकलं फळ