‘या’ फिटनेस ट्रेनरला ओळखलं का? डाएटशिवाय कमी केलं 20 किलो वजन, लोकांनाही करतोय मार्गदर्शन
- Published by:Tushar Shete
Last Updated:
सुप्रतिम चौधरी, एक फिटनेस ट्रेनर आणि लेव्हल 4 न्यूट्रिशनिस्ट आहे. तो त्याच्या इंस्टाग्राम पेजवरून लोकांना वजन कमी करण्याच्या साध्या आणि सोप्या टिप्स् देत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्याने कोणत्याही कठोर डाएटशिवाय स्वतःच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिलीये.
मुंबई : वाढतं वजन ही आजच्या तरूणांच्या आयुष्यातली एक जटील समस्या झालीये. अनेकांना वजन कमी करण्याची इच्छा होतेय. मात्र कोणाला जीमला जाता येत नाही तर कोणाला डाएट फॉलो करता येत नाही. अशा लोकांसाठी सुप्रतिम चौधरीने एक व्हिडिओ शेअर करून आश्चर्याचा धक्का दिलाय.
कोण आहे सुप्रतिम?
सुप्रतिम चौधरी, एक फिटनेस ट्रेनर आणि लेव्हल 4 न्यूट्रिशनिस्ट आहे. तो त्याच्या इंस्टाग्राम पेज, ‘द सुप्रतिम ऑफिशियलवरून लोकांना वजन कमी करण्याच्या साध्या आणि सोप्या टिप्स् देत असतो. त्याने एक कोटी लोकांच्या आरोग्यामध्ये बदल घडवण्याचा संकल्प केलाय. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्याने कोणत्याही कठोर डाएटशिवाय स्वतःच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिलीये. इतकंच काय तर त्याने त्याचा आधीचा आणि 20 किलो वजन कमी केल्यानंतरचा फोटोही शेअर केलाय.
advertisement

जलद वजन कमी करण्यासाठी पाच सुवर्ण नियम
‘20 किलो जलद वजन कमी करण्याचे 5 सुवर्ण नियम’ असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.
पहिला नियम संध्याकाळी 7-8 पर्यंत तुमचे जेवण संपवा.
दुसरा नियम दिवसातून 3-4 लीटर पाणी प्या.
तिसरा नियम दररोज 50 टक्के कमी खाण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्या शरीरारत कॅलरीजची कमतरता राहील.
advertisement
चौथा नियम 30-40 मिनिटांसाठी दररोज एक साधी व्यायाम करा.
पाचवा नियम तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही तणावमुक्त राहणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
advertisement
घरी शिजवलेलेच खा
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सुप्रतिम सांगतो, तुम्ही कठोर डाएट न करता, साध्या नियमांचं पालन केलं तरीही तुम्ही तुमचं वजन घटवू शकता. यासाठी त्याने 5 महत्वाच्या नियम पाळण्याच्या सूचना दिल्यात.
नियम 1 फक्त घरी शिजवलेले अन्न खा
नियम 2 तुमच्या जेवणाच्या वेळा निश्चित करा.
नियम 3 तुमच्या आहारात प्रथिने, कर्बोदके, फॅट्स अशा सर्व प्रकारच्या घटकांचा समावेश करा आणि तुमच्या आहारात हिरव्या सॅलडचा समावेश करा.
advertisement
नियम 4 तुमचं जेवणाचं ताट एकदाच भरून घ्या. ते संपलं आणि तुम्हा भूक जरी असली तरीही पुन्हा जेवण वाढून घेऊ नका.
नियम 5 खाण्याच्या वेळी कोणत्याही प्रकारची उपकरणे वापरू नका कारण त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होतो.
advertisement
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात पण परिणाम दिसत नाहीत?
तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल मात्र तुम्हाला फरक दिसत नसेल तर तळलेले पदार्थ तुम्हाला टाळायला हवेत. अधूनमधून ते खाणं ठीक आहे पण कायम स्वरूपी नको.एका मुलाखतीत, ग्रेटर नोएडातील यथार्थ रुग्णालयाच्या पोषण आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. किरण सोनी यांनी खाण्याच्या सवयींबद्दल जागरूक राहण्याचा आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणू शकणाऱ्या विशिष्ट पदार्थापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. ते म्हणतात ‘चिप्स, कुकीज आणि फास्ट फूड खाणे टाळा. त्यात अनेकदा चरबी आणि अतिरिक्त साखर जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते.’
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2024 7:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
‘या’ फिटनेस ट्रेनरला ओळखलं का? डाएटशिवाय कमी केलं 20 किलो वजन, लोकांनाही करतोय मार्गदर्शन