कास पठार पाहण्यासाठी निघालात? वाहतूक मार्गात केलाय 'हा' महत्त्वाचा बदल, जाणून घ्या नवीन मार्ग

Last Updated:

Kaas Pathar : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने...

Kaas Pathar
Kaas Pathar
Kaas Pathar : जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून 31 ऑक्टोबरपर्यंत कास पठारावर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
वाहतुकीचा नवीन मार्ग
सुट्ट्यांच्या दिवशी कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली होती. ही कोंडी टाळण्यासाठी साताऱ्याकडून कास पठार आणि बामणोलीकडे जाणारी वाहने कास पठार आणि कास धरणावरून बामणोलीकडे जातील.
परत येण्याचा मार्ग
बामणोली आणि कास धरणाकडून साताऱ्याकडे येताना वाहनांना वेगळा मार्ग वापरावा लागणार आहे. ही वाहने बामणोली-कास धरणाच्या बाजुने घाटाई देवी मंदिर-घाटाई फाटा मार्गे साताऱ्याकडे परत येतील. या काळात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही.
advertisement
बामणोलीकडे जाताना असे जा...
  • सातारा-घाटाई फाटा-कास पठार-कास तलाव-बामणोली
परत माघारी येण्याचा मार्ग...
  • बामणोली-कास धरण भिंत-वांजळवाडी-घाटाई देवी मंदिर-घाटाई फाटा-सातारा
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
कास पठार पाहण्यासाठी निघालात? वाहतूक मार्गात केलाय 'हा' महत्त्वाचा बदल, जाणून घ्या नवीन मार्ग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement