Child Health : 'या' गंभीर आजारामुळे लहान वयातच बाळाचं चालणं होत बंद, उपचार नाहीत पण 'अशी' घेऊ शकता काळजी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजकल बदलत्या आणि वाईट जीवनशैलीमुळे अनेक लोक अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. अशातच काही आजार असे आहेत ज्यांचे उपचार करणे कठीण जाते.
What Is Muscular Dystrophy : आजकल बदलत्या आणि वाईट जीवनशैलीमुळे अनेक लोक अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. अशातच काही आजार असे आहेत ज्यांचे उपचार करणे कठीण जाते. मस्क्युलर डिस्ट्रॉफी (Muscular Dystrophy) हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे, जो स्नायूंना हळूहळू कमकुवत करतो. हा एक अनुवांशिक आजार आहे, ज्यामुळे शरीरातील स्नायूंचे कार्य बिघडते आणि ते कमकुवत होऊ लागतात. याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावर होतो, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते.
मस्क्युलर डिस्ट्रॉफी समजून घेण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे
नेमकं काय आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी?
मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये शरीरात 'डिस्ट्रोफिन' नावाच्या प्रथिनांची कमतरता असते. हे प्रथिन स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असते. या प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात आणि हळूहळू त्यांची कार्यक्षमता संपते.
अनुवांशिक कारण
हा एक अनुवांशिक रोग आहे, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार असेल, तर पुढील पिढीला तो होण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
कोणावर आणि कसा होतो परिणाम?
मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा परिणाम कोणत्याही वयोगटातील व्यक्तीवर होऊ शकतो. पण, काही प्रकार लहान मुलांमध्ये जास्त आढळतात. सुरुवातीला हात-पाय आणि खांद्यांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हळूहळू याचा परिणाम चालण्यावर, बोलण्यावर आणि गिळण्यावरही होतो. वयाच्या आठव्या वर्षानंतर हा आजार असल्यास बाळाच्या शरीरावर परिणाम दिसून येतो, बाळाच्या चालण्यावर परिणाम होतो, चालणे थांबते, कधीकधी बोलण्यातही त्रास होऊ शकतो.
advertisement
गर्भवतींसाठी तपासणी महत्वाची
हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला जाऊ नये म्हणून गर्भवतींची जनुकीय तपासणी महत्वाची आहे. यामुळे अशी काही लक्षणे असल्यास त्यावर निदान करून अनेक संकटे टाळता येऊ शकतात.
लक्षणे
या आजाराची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट दिसत नाहीत. लहान मुलांमध्ये वारंवार पडणे, उठण्यासाठी मदत लागणे, आणि चालण्यात अडचण येणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
advertisement
उपचार आणि व्यवस्थापन
मस्क्युलर डिस्ट्रॉफी पूर्णपणे बरा करणारा कोणताही उपचार अजून उपलब्ध नाही. पण, काही उपचारांनी लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते आणि रुग्णाचे आयुष्य अधिक सोपे बनवता येते. यात फिजिकल थेरपी, व्यावसायिक थेरपी आणि औषधांचा समावेश असतो.
सध्याचे संशोधन
जगभरात या आजारावर संशोधन सुरू आहे. स्टेम सेल थेरपीआणि जीन थेरपी सारख्या नवीन तंत्रज्ञानावर प्रयोग सुरू आहेत, ज्यामुळे भविष्यात या आजारावर अधिक चांगला उपचार मिळू शकेल. मस्क्युलर डिस्ट्रॉफी एक गंभीर आजार असला तरी, योग्य वेळी निदान आणि उपचारांनी रुग्णाला सामान्य जीवन जगता येते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 9:03 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Child Health : 'या' गंभीर आजारामुळे लहान वयातच बाळाचं चालणं होत बंद, उपचार नाहीत पण 'अशी' घेऊ शकता काळजी