Paithani Dress In Dadar: पारंपरिक पैठणीपासून तयार केलेल्या 80 प्रकारच्या वस्तू, दादरमध्ये एकाच ठिकाणी करा खरेदी, किंमतही स्वस्त, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
पैठणीपासून बनलेले कपडे घालायला अनेकांना आवडतात. येथे पारंपरिक पैठणीपासून तयार केलेल्या सुमारे 70 ते 80 प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत.
मुंबई : पैठणीपासून बनलेले कपडे घालायला अनेकांना आवडतात. दादर हिंदमाता परिसरात असलेला नाविन्यास हा एक खास पैठणी स्टुडिओ असून येथे पारंपरिक पैठणीपासून तयार केलेल्या सुमारे 70 ते 80 प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. हा स्टुडिओ केवळ साड्यांपुरता मर्यादित न राहता महिलांसाठी इंडो-वेस्टर्न, एथनिक वेअर, पुरुषांसाठी मोदी जैकेट्स, पैठणी टोप्या, ब्रोचेस, तसेच मुलांसाठी किड्स वेअर आणि संपूर्ण कुटुंबासाठी कॉम्बो कलेक्शन देखील उपलब्ध करून देत आहे.
नाच ग घुमा पॅटर्नमध्ये तयार केलेले इंडो-वेस्टर्न जॅकेट्स, 1050 रुपयांपासून पैठणी दुपट्टे, 2850 रुपये किंमतीची मोदी जैकेट्स, 300 रुपये दरात पैठणी पासून तयार केलेल्या टोप्या आणि ब्रोचेस, पैठणी ट्रे छोटा 1050, मोठा 1250, मोबाईल स्लिंग 550, आणि नथ लावलेली पॉकेट 750 रुपयांमध्ये येथे मिळते. हे सर्व पर्याय खास गिफ्टिंगसाठी उपयुक्त आहेत.
advertisement
स्टुडिओमध्ये गणपतीसाठी पैठणी बॅकड्रॉप्स, पर्सेस, क्लचेस यांसारख्या अॅक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, नाविन्यास भारतासह जगभरात डिलिव्हरीची सुविधा देतो आणि क्युरिअर शुल्कही खूपच माफक ठेवले आहे.
advertisement
महिलांसाठी एक खास योजना म्हणजे पैठणी बिशी ज्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम 1000 किंवा 2000 भरून शेवटच्या महिन्यात उर्वरित रक्कम भरून प्युअर पैठणी खरेदी करता येते. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या नाविन्यास स्टुडिओमध्ये पैठणीचे अनेक रूपांत दर्शन घडते आणि प्रत्येक वयोगटासाठी काही ना काही खास पर्याय येथे मिळतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2025 6:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Paithani Dress In Dadar: पारंपरिक पैठणीपासून तयार केलेल्या 80 प्रकारच्या वस्तू, दादरमध्ये एकाच ठिकाणी करा खरेदी, किंमतही स्वस्त, Video