Women Success Story: विदेशातून आल्या परत, माय देशी सुरू केला क्राफ्टिंग व्यवसाय, महिन्याला तब्बल एवढी कमाई, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Women Success Story: मस्कत वरून आलेल्या एका भारतीय महिलेने नाशिकमध्ये आपल्या हाताने बनविलेल्या सुंदर अशा हँड क्राफ्टिंग वस्तूंचा व्यवसाय सुरू केला आहे. ज्यात त्या विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट बॉक्स बनवत असतात.
नाशिक: मस्कत वरून आलेल्या एका भारतीय महिलेने नाशिकमध्ये आपल्या हाताने बनविलेल्या सुंदर अशा हँड क्राफ्टिंग वस्तूंचा व्यवसाय सुरू केला आहे. ज्यात त्या विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट बॉक्स बनवत असतात. घरात न बसता काहीतरी व्यवसाय करावा या विचाराने सुरू केलेल्या या छोट्याशा व्यवसायातून आता ही महिला घरी बसून महिन्याला 40 ते 50 हजारांची कमाई करत आहे.
डेलनाझ या भारतीय आहेत. लग्नानंतर त्या मस्कत या ठिकाणी वास्तव्यास होत्या आणि त्या ठिकाणी त्या नोकरीला देखील होत्या. परंतु लग्नाच्या काही वर्षानंतर डेलनाझ यांना मुलगा झाल्याने त्यांना त्यांची नोकरी सोडावी लागली होती. नोकरी करणारी महिला घरात कशी बसणार? या विचाराने त्यांनी मस्कतमध्येच एक छोटा बेकरी व्यवसाय सुरू केला. परंतु यात काही येत नाही आणि आपण या व्यवसायात इतरांच्या मागेच राहू याकरिता त्यांनी तो व्यवसाय बंद करण्याचे ठरविले.
advertisement
त्यानंतर डेलनाझ यांनी आपल्या अंगातील कलागुणांचा वापर करून हाताने ग्रीटिंग कार्ड बनविणे तसेच गिफ्ट बॉक्स तयार करणे, त्यांना सजवणे, हाताने फोटो फ्रेम्स बनविणे अशा वस्तू तयार करून मस्कतमधील फ्लॉवर शॉप, गिफ्ट शॉपवर विक्री करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या आपल्या मायदेशी भारतात आल्या.
advertisement
या ठिकाणी देखील त्या शांत बसल्या नाहीत. लोक नवीन, व्यवसाय नवीन, तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि त्या आपले काम करत राहिल्या. नाशिकमध्ये हे सर्व करत असताना त्यांच्या या वस्तूंना फारशी काही मागणी होत नसल्याचे त्या सांगत असतात. परंतु तरी देखील मी माझ्या वस्तू बनवून सोशल मीडिया या ठिकाणी पोस्ट करत असे. त्या ठिकाणाहून मला माझ्या कामासाठी विचारणा होऊ लागली आणि मी पुन्हा माझे काम जोरात सुरू केले, असे त्या सांगत असतात.
advertisement
डेलनाझ आता 2018 पासून नाशिकमध्ये आपल्या या हाताने बनविलेल्या ग्रीटिंग कार्ड, फोटो फ्रेम, गिफ्ट बॉक्स बनवून विक्री करत असतात. आता त्यांनी नवीन मेणबत्ती लाईट देखील तयार केले आहेत आणि यांच्या या नवीन वस्तूला सध्या चांगलीच मागणी मिळत आहे. सुरुवातीला फक्त 5 कार्ड विकून सुरुवात झाली असता आज नाशिकमध्ये घरात बसून डेलनाझ 40 ते 50 हजारांचे उत्पन्न देखील घेत आहेत. तसेच त्या इतरांना देखील रोजगार मिळावा याकरिता या वस्तूंचे क्लास सुद्धा घेत असतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
July 10, 2025 4:55 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: विदेशातून आल्या परत, माय देशी सुरू केला क्राफ्टिंग व्यवसाय, महिन्याला तब्बल एवढी कमाई, Video