Women Success Story: नोकरी गेली, पण खचल्या नाही, गावी येऊन सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 2 लाख कमाई, Video

Last Updated:

Women Success Story: आता प्रीती महिन्याला 1 ते 2 लाखांची कमाई देखील करत आहेत. त्याच बरोबर आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून त्या इतरांना सुद्धा रोजगार देतात. 

+
कोरोना

कोरोना काळात गेली नोकरी केला स्वतःचा व्यवसाय आज करत आहे मोठी कमाई

नाशिक : प्रीती चव्हाण या मुंबईमध्ये इंटिरियर डिझायनर म्हणून एका नामांकित कंपनीत कामाला होत्या. परंतु कोरोना काळात प्रीती आणि त्यांच्या पतीची सोबतच नोकरी सुटल्याने त्यांनी आपल्या गावी नाशिकला येऊन स्वतःची रांगोळी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. ज्यात त्या रांगोळीचे साचे बनवत असतात. त्या माध्यमातून आता प्रीती महिन्याला 1 ते 2 लाखांची कमाई देखील करत आहेत. त्याच बरोबर आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून त्या इतरांना सुद्धा रोजगार देतात.
प्रीती यांनी आपले शिक्षण इंटिरियर डिझायनिंग यामधून पूर्ण केले त्यानंतर ते मुंबईला मोठ्या कंपनीत कामाला होत्या. परंतु कोरोना काळात कंपनीने त्यांना नोकरीवरून काही दिवस थांबण्याचे सांगितले. त्या पाठोपाठ त्यांच्या पतीचे देखील काम थांबले. त्या काळात या दोघांनी नाशिकला येण्याचे ठरविले. कोरोनानंतर पुन्हा आपण सुरुवात करू या विचाराने त्यांनी मोहिनी राज एंटरप्राइज या नावाने कंपनी सुरू केली
advertisement
या कंपनीत ते सुरुवातीला रिफ्लेक्शन दिवे बनवीत असतं. परंतु काही काळानंतर या व्यवसायाला देखील चालना मिळत नसल्याने त्यांनीप्लास्टिक रांगोळी बनवून विक्री करण्याचे ठरविले. त्यानंतर स्वतः डिझायनर असल्याने त्यांनी तब्बल 60 पेक्षा अधिक स्वतःचे डिझाइन यात बनवले
advertisement
आज त्या संपूर्ण महाराष्ट्रात आपली ही रांगोळी विक्री करत असतात. त्याच बरोबर त्या आपल्या या रांगोळीच्या साच्यांच्या माध्यमातून इतरांना देखील रोजगार पुरवत आहेत. यांच्याकडे हे रांगोळीचे साचे फक्त 10 रुपयांपासून मिळतात.
तुम्ही यांच्याकडून या वस्तू घेऊन स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकणार आहात. याकरिता त्यांनी मोहिनी राज रांगोळी या नावाने इन्स्टाग्राम पेज देखील सुरू केले आहे. तसेच फेसबुकवर देखील तुम्ही यांच्या या रांगोळ्यांचे डिझाइन बनून ऑर्डर करू शकणार आहात
advertisement
आज प्रीती या त्यांच्या व्यवसायातून महिन्याला 1 ते 2 लाखांचे उत्पन्न देखील घेत आहेत. तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकणार असल्याने प्रीती यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: नोकरी गेली, पण खचल्या नाही, गावी येऊन सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 2 लाख कमाई, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement