Success Story: जिद्द असावी तर अशी, शिक्षणासोबतच व्यवसाय करण्याचा निर्णय, 22 वर्षांच्या शामलचा केक स्टॉल चर्चेत, Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शामल मोरे हिने सुरू केलेला कप केक स्टॉल सध्या ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे. शिक्षणासोबतच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलेल्या शामलने अल्पावधीतच यशस्वी पाऊल टाकलं आहे.
मुंबई: वरळी कोळीवाड्याजवळ 22 वर्षांची शामल मोरे हिने सुरू केलेला कप केक स्टॉल सध्या ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे. शिक्षणासोबतच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलेल्या शामलने अल्पावधीतच यशस्वी पाऊल टाकलं आहे. शामल सध्या पदवी शिक्षण घेत असून, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत ती एका केक शॉपमध्ये नोकरी करते. याच कामाचा अनुभव घेऊन संध्याकाळी ती स्वतःचा कप केक स्टॉल चालवते.
कोरोनाच्या काळात वेळ मिळाल्याने शामलने केक बेकिंगचा क्लास जॉईन केला. त्यानंतर तिने घरीच ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. हळूहळू तिचे बनवलेले केक आणि डिझाइन्स ग्राहकांना पसंत पडू लागले. ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता तिने पुढे व्यवसायात अधिक लक्ष द्यायचं ठरवलं.
शिक्षणासोबत नोकरी आणि आता स्वतःचा व्यवसाय
शामलने केवळ बेकिंग शिकलं नाही, तर अनुभव मिळवण्यासाठी एका केक शॉपमध्येही नोकरी केली. ती सध्या सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केक शॉपमध्ये काम करते. यासोबतच पदव्युत्तर शिक्षणही सुरू आहे. त्याचवेळी संध्याकाळच्या वेळेत तिने स्वतःचा पार्ट टाइम कप केक स्टॉल सुरू केला.
advertisement
Women Success Story: नोकरी सोडली, 2 मैत्रिणीनी बनवला फॅशन ज्वेलरी ब्रँड, महिन्याची कमाई पाहाच, Video
किमती माफक, दर्जा उत्तम
शामलच्या स्टॉलवर केक फक्त 30 रुपयांपासून सुरू होतात. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, तरुण आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने स्टॉलला भेट देतात. वेगवेगळ्या चवीनुसार कप केक, डिझाइन आणि क्वालिटी हे तिच्या उत्पादनांचे वैशिष्ट्य ठरत आहे.
advertisement
घरातून मदतीचा हात
शामलच्या घरात आई, भाऊ आणि ती अशी तिघांचं कुटुंब आहे. आई कपड्यांच्या दुकानात काम करते, तर शामलने व्यवसायासाठी लागणारी सुरुवातीची 50 ते 70 हजार रुपयांची गुंतवणूक स्वतः साठवलेल्या पैशातून केली आहे.
यशस्वी पाऊल टाकणाऱ्या उद्योजिका
अवघ्या 6 महिन्यांमध्ये तिच्या व्यवसायातून एक लाख रुपयांहून अधिकची उलाढाल झाली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता भविष्यात मोठं युनिट सुरू करण्याचं तिचं उद्दिष्ट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 09, 2025 10:05 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: जिद्द असावी तर अशी, शिक्षणासोबतच व्यवसाय करण्याचा निर्णय, 22 वर्षांच्या शामलचा केक स्टॉल चर्चेत, Video









