advertisement

Mumbai LPG Crisis: मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव संकटात, प्लेटमधून गायब होणार समोसा-भजी! कारण काय?

Last Updated:

Mumbai Vada Pav: मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वडापाव, समोसे आणि भजीचे स्टॉल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. प्रसिद्ध 'लाडू सम्राट' आणि 'गुलाटी' सारख्या दुकानांनाही याचा फटका बसला असून पावाचा पुरवठाही धोक्यात आला आहे.

मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव संकटात, प्लेटमधून गायब होणार समोसा-भजी! कारण काय?
मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव संकटात, प्लेटमधून गायब होणार समोसा-भजी! कारण काय?
मुंबई: मुंबईकरांची कमी पैशांमध्ये भूक भागवणारा पदार्थ म्हणून वडापावला चांगलीच मागणी असते. खिशात मोजके पैसे असले तरी वडापावच्या जीवावर अनेकजण पूर्ण दिवस काढतात. त्यामुळे कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट पर्यंत सगळीकडे वडापावचे चाहते असतात. मात्र , मुंबईकरांची भूक भागवणारा हा वडापाव आता संकटात आला आहे. मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरून वडापाव, समोसे-भजी गायब होणार आहे.
मुंबईची ओळख असलेल्या या स्ट्रीट फूडवर आता संकटाचे सावट पसरले आहे. व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईकरांचा लाडका वडापाव, गरमागरम समोसे आणि भजी रस्त्यांवरून गायब होऊ लागली आहेत. रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि सामान्य कामगारांची भूक भागवणारे हे पदार्थ गॅसअभावी मिळणे कठीण झाले आहे.

प्रसिद्ध दुकानांनाही बसला फटका

लालबागचा प्रसिद्ध 'लाडू सम्राट' असो वा जुहूचे लोकप्रिय 'गुलाटी', सर्वांनाच या टंचाईचा फटका बसला आहे. 'लाडू सम्राट'चे मालक कमलाकर राक्षे म्हणाले, " बुधवारी, आमचे दुकान बंद होते. गुरुवारी चार सिलिंडर मिळाले म्हणून दुकान उघडले, पण पुढे काय होईल सांगता येत नाही." दुसरीकडे, जुहूच्या गुलाटी रेस्टॉरंटने समोशांच्या ऑर्डर्स घेणे बंद केले आहे. मालक विकी गुलाटी यांनी चिंता व्यक्त केली की, जर ही टंचाई अशीच राहिली तर त्यांच्या १०० कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर होईल.
advertisement

पाव आणि ब्रेडही संकटात...

मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असणारे पाव-ब्रेडदेखील संकटात आहेत. पाव-ब्रेडच्या पुरवठ्यावरही आता संकट निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच कोळशाआधारीत बेकरी बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने काढले होते. गॅसआधारीत भट्टी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यातील काही बेकरींकडूनच गॅसच्या भट्टीचा वापर सुरू झाला होता. तर, इतरांनी बेकरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पावाच्या उत्पादनावर परिणाम झालेला. आता, गॅसच्या टंचाईमुळे पाव-ब्रेडचे उत्पादन कमी होण्याची भीती आहे.
advertisement

काळ्या बाजारात सिलिंडरची विक्री

व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने अनेक छोटे स्टॉलधारक घरगुती सिलिंडरचा वापर करत आहेत. काळा बाजारमध्ये सिलिंडर १,३०० ते १,८०० रुपयांना विकले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai LPG Crisis: मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव संकटात, प्लेटमधून गायब होणार समोसा-भजी! कारण काय?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement