Women Success Story: नोकरी सोडली, 2 मैत्रिणीनी बनवला फॅशन ज्वेलरी ब्रँड, महिन्याची कमाई पाहाच, Video

Last Updated:

एकाच कंपनीत नोकरी करत असताना त्यांना तोच तोचपणा जाणवू लागला. सुरक्षित नोकरी सोडून व्यवसायाच्या अनिश्चित वाटेवर चालण्याचा निर्णय सोपा नव्हता पण त्यांनी तो घेतला आणि मोडस या फॅशन ज्वेलरी ब्रँडची सुरुवात झाली.

+
मोडस’

मोडस’ दोन मैत्रिणींच्या धैर्य, कल्पकता आणि मेहनतीने घडलेला ब्रँड.

मुंबई : स्वतःसाठी काहीतरी करायचंय हा विचार अनेकांच्या मनात येतो पण त्या विचाराला कृतीची जोड देणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. मात्र आरती मटकर आणि पूर्वी मेहता या दोन मैत्रिणींनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. एकाच कंपनीत नोकरी करत असताना त्यांना तोच तोचपणा जाणवू लागला. सुरक्षित नोकरी सोडून व्यवसायाच्या अनिश्चित वाटेवर चालण्याचा निर्णय सोपा नव्हता पण त्यांनी तो घेतला आणि मोडस या फॅशन ज्वेलरी ब्रँडची सुरुवात झाली.
आज या ब्रँडला सात वर्षं पूर्ण झाली असून, त्यांच्या ज्वेलरीचा खास अंदाज आणि दर्जा पाहता ग्राहकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोडस हे नाव इटालियन भाषेतून घेतले असून, त्याचा अर्थ आहे स्टाइल किंवा ट्रेंड आहेअसं पूर्वी मेहता सांगतात. यांना नेहमीच काहीतरी हटके आणि युनिक बनवायचं होतं आणि त्यामुळे त्यांच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये हँडमेड, ट्रेडिशनल, इंडो-वेस्टर्न अशा विविध शैलींचा समावेश केला.
advertisement
सुरुवातीला घरून छोट्या प्रमाणावर सुरू झालेला हा ब्रँड आता एका प्रोफेशनल स्टुडिओमध्ये रूपांतरित झाला आहे. दादरमध्ये त्यांनी तीन वर्षांपूर्वी स्वतःचा स्टुडिओ उभारला आणि आता त्यांचा ब्रँड केवळ मुंबईतच नव्हे, तर बेंगळुरूपर्यंत पोहोचला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली ज्वेलरी सर्वत्र पोहोचवली असून, अनेक एक्झिबिशनमध्येही मोडसला विशेष स्थान मिळालं आहे.
advertisement
आज त्यांचं मासिक उत्पन्न 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. आरती आणि पूर्वी यांचं मत स्पष्ट आहे की यश एक दिवसात मिळत नाही. व्यवसाय म्हणजे रोज नवीन शिकलं जातं, रोज नवे अनुभव येतात. काही वेळा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळतोपण तेच अनुभव पुढच्या टप्प्यावर उपयोगी पडतात. सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत हेच यशाचं गमक आहे. मोडसचा हा प्रवास नव्या पिढीतील उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: नोकरी सोडली, 2 मैत्रिणीनी बनवला फॅशन ज्वेलरी ब्रँड, महिन्याची कमाई पाहाच, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement