Food Business: क्वालिटी अन् कॉन्टिटी एक नंबर! बटाटा वडा नव्हे, मुंबईकर विकतोय चिकन वडापाव!

Last Updated:

Mumbai Food: मुंबईच्या खाद्य संस्कृतीत वडापाव हा महत्त्वाचा पदार्थ आहे. आता एका मराठमोळ्या तरुणानं चक्क चिकन वडापाव सुरू केला आहे.

+
क्वालिटी

क्वालिटी अन् कॉन्टिटी एक नंबर! बटाटा वडा नव्हे, मुंबईकर विकतोय चिकन वडापाव!

मुंबई – वडापाव म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो गरमागरम बटाट्याचा वडा आणि मऊसूत पाव. पण या पारंपरिक वड्याला हटके वळण देत 'चविष्ट वेंचर्स'ने एक आगळावेगळा प्रयोग केला आहे, तो चिकन वडा पाव! या युनिक संकल्पनेमागे एक जिद्दी उद्योजक विमल मयेकर हे आहेत. दहिसर पूर्वमधील अशोकवन येथे छोटासा पण लोकप्रिय फूड कॉर्नर 'चविष्ट वेंचर्स' आहे. इथे फक्त 60 रुपयांपासून सुरू होणारे वेगवेगळ्या चवीचे वडापाव उपलब्ध आहेत. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
विमल मयेकर यांनी लॉकडाऊनपूर्वी आपल्या फूड स्टॉलची सुरुवात केली होती. मात्र केवळ सहा महिन्यांतच देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे नव्याने सुरू केलेला व्यवसाय थांबला. अनेक जण अशा वेळी नाउमेद झाले असते, पण विमल यांनी हार मानली नाही. लॉकडाऊननंतर, पत्नीच्या साथीने त्यांनी ‘चविष्ट वेंचर्स’ला नवं रूप दिलं. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे त्यांनी आपल्या मेन्यूमध्ये वेगवेगळे वडा पाव प्रकार तसेच इतरही खाद्यपदार्थ समाविष्ट केले.
advertisement
चिकन वडा पावची एक नंबर चव
‘चविष्ट वेंचर्स’मध्ये मिळणारा चिकन वडा पाव हा अनेक ग्राहकांसाठी नवीन आणि स्वादिष्ट अनुभव ठरतो आहे. पारंपरिक वड्याला चिकनची चव देणं ही एक धाडसी कल्पना होती, पण ती लोकांनी उत्साहाने स्वीकारली. शिवाय, शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे खाद्यप्रेमी येथे आपली भूक भागवू शकतात.
advertisement
यशस्वी वाटचाल
विमल मयेकर यांची आजची वार्षिक कमाई 5 ते 6 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही, तर इतरांनाही रोजगाराच्या संधी दिल्या. “मराठी माणसाने व्यवसाय करावा, आणि आपल्या जीवावर इतरांचेही पोट भरावे,” या विचाराने प्रेरित होऊन काम करत असल्याचे मयेकर सांगतात.
view comments
मराठी बातम्या/Food/
Food Business: क्वालिटी अन् कॉन्टिटी एक नंबर! बटाटा वडा नव्हे, मुंबईकर विकतोय चिकन वडापाव!
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement