'10 वर्षे ज्या दिराचे पालन-पोषण केलं त्यानेच आज...',नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन जावा आमने-सामने

Last Updated:

निवडणुकीत नलिनी भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकडे या काँग्रेस पक्षातर्फे रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.

News18
News18
अमरावती : नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. आता अनेक ठिकाणी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणी कुटुंबातील सदस्यांमध्येच प्रमुख लढती होणार आहेत. दर्यापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा चुरस शिगेला पोहोचली आहे. यंदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन जावांमध्ये थेट सामना होणार आहे. मात्र ही लढत चुरशीची असली तरी थोरल्या जावेने मात्र याविषयी खंत व्यक्त केली आहे.
दहा वर्षे ज्या दिराचे पालन पोषण केले ,त्याच दिराने जाऊ बाईंना विरोधात उभे केलं याच वाईट वाटतं. केवळ राजकारणासाठी घर दुभंगले, अशी खंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनी भारसाकडे यांनी व्यक्त केली आहे.गेल्या आठ टर्म पासून विधानसभेच नेतृत्व करणारे भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे.आमदार पत्नी नलिनीताई भारसाकडे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभ्या असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान याच निवडणुकीत नलिनी भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकडे या काँग्रेस पक्षातर्फे रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.
advertisement

काय म्हणाल्या नलिनी भारसाकडे ?

मंदाताई भारसाकडे यांच्या पतीचे दहा वर्षे पालनपोषण करूनही दिराने पत्नीला विरोधात उभा केल्याने याच मला वाईट वाटतं, केवळ राजकारणासाठी कुटुंब दुभंगल्याची प्रतिक्रिया नलिनी भारसाकडे यांनी दिली.गेल्या निवडणुकीत नलिनी भारसाकडे यांच्याविरोधात त्यांचे दिर सुधाकर भारसाकडे हे उभे होते मात्र गेल्या वेळी नगराध्यक्षपदी नलींनी भारसाकडे विजय झाल्या होत्या.
advertisement

दर्यापूरमध्ये राजकीय वातावरण तापलं

नलिनी भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकडे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणातच नव्हे तर कुटुंबातील तणावही चव्हाट्यावर आला आहे. दोन जावा, दोन भिन्न पक्ष आणि एकाच पदाची निवडणूक यामुळे दर्यापूरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
'10 वर्षे ज्या दिराचे पालन-पोषण केलं त्यानेच आज...',नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन जावा आमने-सामने
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement