भाजपची विजयी सुरुवात, bjp मंत्र्यांच्या 'मातोश्रीं'नी उधळला गुलाल, विरोधकांचा धुव्वा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दोंडाईचा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल यांच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पण त्यांच्या निवडीची औपचारीक घोषणा होणे बाकी आहे.
Dhule Nagar Panchayat Election : दिपक बोरसे, प्रतिनिधी, धुळे : राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकाचा धुराळा सुरू असून त्यात राज्यात धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांनी जादू करीत भाजपचा नगराध्यक्षपद बिनविरोध करीत खाते उघडले आहे. मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.तसेच नगरसेवक पदासाठी भाजपचे ७ जणांचा एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने भाजपचे नगराध्यक्षासह ७ नगरसेवक बिनविरोध निवड झाले आहेत. या निवडीची अद्याप औपचारीच घोषणा होणे बाकी आहे. दरम्यान हा विजय मिळवून भाजपने महाराष्ट्रात खातं उघडलं आहे.
राज्यात नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरु असून काल अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती त्यानंतर आज छानणी प्रक्रिया पार पडली यात दोंडाईचा वरवडे नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल यांचा तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार) वतीने शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.
advertisement
आज झालेल्या अर्ज छानणी प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. यामुळे भाजपच्या नगराध्यक्षा पदाचा उमेदवार नयनकुंवर ताई रावल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे, याशिवाय नगरसेवक पदासाठी ७ जागांवर केवळ भाजपच्याच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यात 1 ब रविना महेश कुकरेजा, 2 अ = सरला छोटू सोनवणे, 7 ब= चतुर जिभाऊ पाटील, 8 ब= राणी राकेश अग्रवाल, 9 अ = वैशाली प्रवीण महाजन, 9 ब= निखिलकुमार रवींद्र जाधव, 13 अ = भरतरी पुंडलिक ठाकूर यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
advertisement
निवडणूक सुरू होण्या आधीच महाराष्ट्रत भाजपचे आपले नगराध्यक्ष बिनविरोध करून खाते उघडले आहे यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे.या निवडीनंतर रावल यांच्या दोंडाईचा येथील रावल गढीवर फटाके फोडून, ढोल ताशे वाढवून जल्लोष करण्यात आला.
दोंडाईचा नगरपालिका झांकी है.. मुंबई महापालिका बाकी है!
महाराष्ट्रात पहिल्या बिनविरोध नगराध्यक्षा ह्या धुळे जिल्ह्यातील माझ्या मूळ गावी झाल्या त्यानिमित्ताने राज्यात भाजपाचे खाते उघडले असून दोंडाईचा नगरपालिका झांकी है.. मुंबई महापालिका बाकी है.. अशी प्रतिक्रिया पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार रावल यांनी दिली आहे
advertisement
आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवरताई रावल व सोबत 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यावेळी नामदार जयकुमार रावल बोलत होते.यावेळी बोलताना नामदार रावल म्हणाले की अजून सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत अजून माघारीपर्यंत याची संख्या वाढेल व आमचा प्रयत्न आहे की पूर्ण नगरपालिका निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
advertisement
view comments
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
November 18, 2025 6:43 PM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
भाजपची विजयी सुरुवात, bjp मंत्र्यांच्या 'मातोश्रीं'नी उधळला गुलाल, विरोधकांचा धुव्वा


