भाजपच्या संकटमोचकांनी अख्खी निवडणूक फिरवली, सेनेचे उमेदवार झाले 'गायब'; कमळ उमलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जामनेर नगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी मोठी खेळी केली आहे. विशेष म्हणजे या खेळीने त्यांनी अख्खी निवडणूक फिरवली आहे. खरं भाजपच्या दोन उमेदरावारांसमोर एकनाथ शिंदे यांच्याच दोन उमेदवारांचे आव्हान होते.
Jalgaun Nagar Panchayat Election : इम्तियाज अहमद,प्रतिनिधी, जळगाव : इम्तियाज अहमद,प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी मोठी खेळी केली आहे. विशेष म्हणजे या खेळीने त्यांनी अख्खी निवडणूक फिरवली आहे. खरं भाजपच्या दोन उमेदरावारांसमोर एकनाथ शिंदे यांच्याच दोन उमेदवारांचे आव्हान होते. पण गिरीश महाजन यांनी या एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना माघार घ्यायला लावली.त्यामुळे भाजपच्या किलुबाई शेवाळे आणि सपना झाल्टे या दोनही नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे गिरीश महाजन यांच्या या खेळीची जामनेरमध्ये मोठी चर्चा आहे.
खरं तर जामनेरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे दोन उमेदवार आमने सामने ठाकले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वॉर्ड नंबर 1 मधून मयुरी चव्हाण आणि वॉर्ड नंबर 13 ब मधुन रेशंता सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता. तर भाजपकडून वॉर्ड 1 नंबर सपना झाल्टे आणि वॉर्ड नंबर 13 मधून औ किलुबाई शेवाळे अर्ज केला होता. त्यामुळे या ठिकाणी भाजप विरूद्ध एकनाथ शिंदे यांच लढत होणार होती.
advertisement
पण या लढतीआधीच गिरीश महाजन यांनी मोठी खेळी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या दोन उमेदवारांना भाजप उमेदवारांसाठी बुधवारी माघार घ्यायला लागली. या माघारीसोबत दोघा उमेदवारांसह शिंदे सेनेच्या उपजिल्हा प्रमुख असलेल्या अतुल सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला.मयुरी चव्हाण व रेशंता सोनवणे यांनी माघार घेत भाजपत प्रवेश केल्याने माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी त्यांचे स्वागत केले होते
advertisement
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मयुरी चव्हाण व रेशंता सोनवणे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या सपना रविंद्र झाल्टे व किलुबाई गिमल्या शेवाळे या बिनविरोध निवडुन आल्या आहेत.त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी 2 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत.
दरम्यान भाजपकडुन मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकुन पक्ष प्रवेश करवुन घेतला जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख अॅड.भरत पवार यांनी केला आहे.
advertisement
भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध
view commentsजळगाव जिल्ह्यातील जामनेर भुसावळ व सावदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने 3 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. भुसावळ येथे वार्ड क्र. 7 अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील बिनविरोध , जामनेर मध्ये वार्ड क्र. 11 ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे बिनविरोध , सावदा मध्ये वार्ड क्र. 7 अ मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध विजय झाला आहे. विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या 3 जागांवर भाजपला बिनविरोध यश मिळालं आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
November 19, 2025 10:56 PM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
भाजपच्या संकटमोचकांनी अख्खी निवडणूक फिरवली, सेनेचे उमेदवार झाले 'गायब'; कमळ उमलं


