Jalgaun Election : घरच्या 'होममिनिस्टर'साठी भाजपच्या संकटमोचकांची मोठी खेळी, नगराध्यक्षपद जिंकलं, विरोधकांचा सुपडासाफ

Last Updated:

गिरीश महाजन यांनी जामनेरच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत मोठी खेळी करून पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड घडवून आणली आहे. गिरीश महाजन यांनी जामनेरच्या या निवडणुकीत ही खेळी करून विरोधकांचा सुपडासाफ केला आहे.

girish Mahajan
girish Mahajan
Jalgaon Election : इम्तियाज अहमद, प्रतिनिधी, जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जळगावमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन एकापेक्षा एक मोठी खेळी करतायत.या खेळीच्या बळावर जळगावच्या नगर पंचायत नगर परिषदेत धक्कादायक निकाल लागतायत.आता गिरीश महाजन यांनी जामनेरच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत मोठी खेळी करून पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड घडवून आणली आहे. गिरीश महाजन यांनी जामनेरच्या या निवडणुकीत ही खेळी करून विरोधकांचा सुपडासाफ केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.जामनेरच्या नगराध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल करण्यात आला होता.पण गिरीश महाजन यांनी मोठी खेळी करून तीनही विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडले आहे. त्यामुळे जामनेरच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
advertisement
जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री गिरीष महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या नगराध्यक्ष मधून बिनविरोध विजय झाल्या आहेत. खरं तर या निवडणूकीत साधना महाजन यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिभा झाल्टे, काँग्रेसच्या रूपाली ललमानी आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचे आव्हान होते. पण ऐनवेळी प्रतिभा झाल्टे, रूपाली ललमानी आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने माघार घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या आहेत.दरम्यान या तीनही उमेदवारांनी उमेदवारी मागे का घेतली? याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही पण यामुळे साधना महाजन बिनविरोध झाल्या आहेत.
advertisement
मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध विजयी झाल्या आहेत.विशेष म्हणजे त्या दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.त्यामुळे विकासाच्या मुद्यावर पुन्हा एकदा आपण चांगलं काम करू अशी पहिली प्रतिक्रिया साधना महाजन यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
Jalgaun Election : घरच्या 'होममिनिस्टर'साठी भाजपच्या संकटमोचकांची मोठी खेळी, नगराध्यक्षपद जिंकलं, विरोधकांचा सुपडासाफ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement