Jalgaon Election : खान्देशात कमळाला बहर,तीन महिला नगरसेवकांनी गुलाल उधळला, भाजपला विजयी सलामी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जळगाव जिल्ह्यातील सावदा, जामनेर आणि भुसावळ या ठिकाणी भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.
Jalgaun Election : इम्तियाज अहमद,प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सावदा, जामनेर आणि भुसावळ या ठिकाणी भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. भुसावळच्या वार्ड क्र.7 अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर जामनेर मध्ये वार्ड क्र. 11 ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे आणि सावदा मध्ये वार्ड क्र. 7 अ मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध निवडून आल्या आहेत.यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर भुसावळ व सावदा नगरपालिका निवडणुकीत भाजपने 3 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. भुसावळ येथे वार्ड क्र. 7 अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील बिनविरोध , जामनेर मध्ये वार्ड क्र. 11 ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे बिनविरोध , सावदा मध्ये वार्ड क्र. 7 अ मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध विजय झाला आहे. विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या 3 जागांवर भाजपला बिनविरोध यश मिळालं आहे.दरम्यान या निकालाची औपचारीक घोषणा अद्याप होणे बाकी आहे.
advertisement
सावदा, भुसावळ आणि जामनेर या ठिकाणी भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. कारण जिल्ह्यातील सावदा, भुसावळ आणि जामनेर या ठिकाणी भाजपची ताकद आहे. त्यामुळे भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर व सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक पदाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
advertisement
दरम्यान, येत्या 2 डिसेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
November 18, 2025 10:13 PM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
Jalgaon Election : खान्देशात कमळाला बहर,तीन महिला नगरसेवकांनी गुलाल उधळला, भाजपला विजयी सलामी


