Nagpur: लोन फेडण्यासाठी जयरामने 2 महिन्यांपासून कट रचला, 14 वर्षांच्या अथर्वचं अपहरण केलं आणि...
- Published by:Sachin S
- Reported by:Uday Timande
Last Updated:
अपहरणानंतर अथर्वला बेशुद्ध करून खंडणी मागण्याचा प्लॅन होता, त्यासाठी आरोपींनी त्याला उंदीर मारण्याचं औषध दिलं. मात्र, अथर्व बेशुद्ध झाला नाही
नागपूर: नागपूरमध्ये मैत्रीच्या नावाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. घरकामासाठी घेतलेले लोनचे पैसे फेडण्यासाठी एका १४ वर्षांच्या मुलाचं अपहरण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून अपहरण आणि हत्येचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा निघाली होती. याच गर्दीत १४ वर्षांचा अथर्व ननोरे सहभागी झाला होता. मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर अथर्व अचानक बेपत्ता झाला. रात्र होऊन पण अथर्व घरी पोहोचला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सगळीकडे शोध सुरू केला. पण तो सापडला नाही. अखेर गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
advertisement
दोन दिवसानंतरही अथर्वचा आढळला मृतदेह
पोलिसांनी CCTV आणि ड्रोन फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. मात्र दोन दिवस उलटूनही काहीच धागा लागला नाही. दरम्यान, मुलगा सापडत नसल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. दोन दिवसांनी भरतवाडा परिसरात एका तरुणाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. तपासात हा मृतदेह अथर्वचाच असल्याचं स्पष्ट झालं.
लोनचे पैसे फेडण्यासाठी रचला कट
अथर्वचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. पोलिसांनी या प्रकरणी सगळ्या बाजूने तपास सुरू केला. या प्रकरणातला सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे अथर्वचा अपहरणकर्ता दुसरा कोणी नसून त्याचाच मित्र जयराम गोपाल यादव (वय १९ वर्ष) हा मुख्य सूत्रधार निघाला. तर केतन रमेश साहू (वय २२ वर्ष) आणि आयुष मोहन साहू (वय १९ वर्ष) या दोघांनी त्याला साथ दिली. अथर्वच्या वडिलांकडे पैसे असल्याची माहिती जयरामला होती. त्यामुळे त्याने ४० ते ५० लाखांच्या खंडणीसाठी हा कट गेल्या दोन महिन्यांपासून रचला गेला होता. घराच्या बांधकामासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे.
advertisement
अपहरणानंतर अथर्वला बेशुद्ध करून खंडणी मागण्याचा प्लॅन होता, त्यासाठी आरोपींनी त्याला उंदीर मारण्याचं औषध दिलं. मात्र, अथर्व बेशुद्ध झाला नाही. त्यामुळे अथर्वने आपल्याला पाहिलं आहे, आता आपलं प्रकरण समोर येईल, त्यामुळे दुपट्ट्याने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह भरतवाडा परिसरात टाकून देण्यात आला पण पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली.
advertisement
या घटनेनंतर अथर्वच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "माझ्या मुलाने कोणाचं काय बिघडलं होतं? त्याला एवढ्या निर्दयीपणे मारलं. या प्रकरणामागचा खरा मास्टरमाईंड शोधा आणि माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी अथर्वच्या आईने केली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर हादरलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 10:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: लोन फेडण्यासाठी जयरामने 2 महिन्यांपासून कट रचला, 14 वर्षांच्या अथर्वचं अपहरण केलं आणि...









