यवतमाळ हादरलं! तरुणाला विवस्त्र करून अमानुष मारहाण, हातपाय बांधून रस्त्यावर फेकलं, विव्हळत सोडला प्राण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ४० वर्षीय व्यक्तीला विवस्त्र करून आणि हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली.
भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ४० वर्षीय व्यक्तीला विवस्त्र करून आणि हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संबंधित व्यक्तीला अर्धमेल्या अवस्थेत फेकून दिलं होतं. संबंधित व्यक्तीचा आता उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना पुसद पोलीकडे काकडदाती परिसरात घडली. सखाराम हुलकाने असं हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते श्रीरामपूर .येथील रहिवासी होते. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ शिवानंद हुलकाने यांनी पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
advertisement
तक्रारीत काय म्हटलं?
शिवानंद हुलकाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या वेळी शिवानंद यांना कळालं की काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ काही जण सखाराम यांना मारहाण करत आहेत. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा सखाराम यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना रस्त्यावर टाकण्यात आले होते. यावेळी आरोपी विठ्ठल नागोराव भाकरे, रोहन भाकरे, प्रशांतकुमार उर्फ पवन भाकरे (सर्व राहणार काकडदाती) आणि योगेश उत्तम भाकरे हे घटनास्थळी उपस्थित होते.
advertisement
विठ्ठल भाकरे हा पाईप तसेच लाथा-बुक्क्यांनी सखाराम यांना बेदम मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर जखमी सखाराम यांना घरी नेण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले. मात्र विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ९:३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
चारही आरोपींना अटक
दरम्यान, पुसद शहर डीबी पथकाने तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि गोपाल इंद्राळे व त्यांचे पथक करीत असून, या अमानुष मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Location :
Yavatmal,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 2:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
यवतमाळ हादरलं! तरुणाला विवस्त्र करून अमानुष मारहाण, हातपाय बांधून रस्त्यावर फेकलं, विव्हळत सोडला प्राण






