Maruti Swift कारचा भयानक अपघात, पलटली अन् चुराडा झाला, 2 जणांचा मृत्यू, हिंगोलीतील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
मारुती सुझुकी स्विफ्ट कारने पाचही तरुण वसमतकडून नांदेडच्या दिशेनं जात होते. पण वसमत ते नांदेड मार्गावरील टाकळगाव परिसरात पोहोचले
मनीष खरात, प्रतिनिधी
हिंगोली: राज्यात आज गुरुवारचा दिवस अपघात वार ठरला आहे. पुण्यात झालेल्या भीषण अपघातानंतर आता हिंगोलीमधून एक कार अपघाताची बातमी समोर आाली आहे. वसमत तालुक्यामध्ये भरधाव कारचं नियंत्रण सुटल्याामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव वसमत नांदेड मार्गावर संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात आशिष भासकरे आणि नितेश खंदारे या दोन तरुणाचा मृत्यू झाला. तर सिद्धांत सांगवीकर, अन्वेश येडके आणि आकाश डोकणे अशी जखमीची नाव आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून उपचार सुरू आाहे.
अपघात नेमका कसा घडला?
मारुती सुझुकी स्विफ्ट कारने पाचही तरुण वसमतकडून नांदेडच्या दिशेनं जात होते. पण वसमत ते नांदेड मार्गावरील टाकळगाव परिसरात पोहोचले असताना अचानक भरधाव वेगाात असलेल्या कारवर चालकाचं नियंत्रण सुटलं. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याकडेला जाऊन उलटली आणि एका शेतातील टीनपत्र्याच्या शेडला जाऊन अडकली. हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. कारचं छत हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.
advertisement
दरम्यान नागरिकांनी आणि वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने जखमी पाचही तरुणांना वसमतच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. परंतु जखमींपैकी दोन तरूणांचा मृत्यू झाला. तर तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात ग्रस्तकारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तिन्ही जखमींवर सध्या नांदेड मधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 10:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maruti Swift कारचा भयानक अपघात, पलटली अन् चुराडा झाला, 2 जणांचा मृत्यू, हिंगोलीतील घटना






