Yellamma Devi: तब्बल 600 वर्षांनी देवी आली दारी, कोल्हापुरात पहिल्यांदाच असं घडतंय!
- Published by:sachin Salve
- local18
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
ज्यांना सौंदत्ती डोंगरावर जाता आलं नाही त्यांच्यासाठी धर्म जागरण समितीमार्फत तब्बल 600 वर्षानंतर यल्लमा देवीचा रथ प्रथमच कोल्हापुरात आणला आहे.
कोल्हापूर : सौंदत्ती, कर्नाटकमध्ये स्थित यल्लम्मा देवीच मंदिर, नुकतीच सौंदत्ती डोंगरावर देवीची यात्रा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांची श्री रेणुका देवी ही कुलस्वामिनी आहे. पण ज्यांना सौंदत्ती डोंगरावर जाता आलं नाही त्यांच्यासाठी धर्म जागरण समितीमार्फत तब्बल 600 वर्षानंतर यल्लमा देवीचा रथ प्रथमच कोल्हापुरात आणला आहे. तब्बल ६०० वर्षांनंतर, देवीचा जग टाक, कलश आणि पादुका डोंगरावरून रथाच्या माध्यमातून सर्व भक्तांसाठी दर्शनासाठी आणण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही यात्रा २० ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. याचा शुभारंभ नुकताच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये पार पडला. सौंदत्ती इथं होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आणि केरळ इथून लाखो भाविक दर्शनाला येत असतात. इथं राहणाऱ्या असंख्य भक्तांची ही कुलस्वामिनी आहे. पण काही भक्तांना हे दर्शन घेणं या काळात शक्य नसतं. त्यामुळे धर्म जागरण समितीमार्फत हा रथयात्रेचा उपक्रम राबवण्यात आला आहे.
advertisement
काय आहे रथयात्रेचे संकल्पना?
मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून यल्लमा देवीच्या रथयात्रेचे आयोजन केलं आहे. धर्मजागरण समितीमार्फत आयोजित करण्यात आलेली ही रथयात्रा तब्बल ६०० वर्षानंतर देवीचा जग व पादुका डोंगरावरून सर्व सामन्यांच्या दर्शनासाठी आपल्या गावापर्यंत आणि दारापर्यंत येत आहे. आई यल्लमा आली आपल्या दारी चला करू स्वागताची तयारी अशा घोषवाक्यमध्ये ही संकल्पना राबवली जात आहे. ही रथयात्रा 20 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. तसंच याची सांगता 29 डिसेंबर 2024 ला होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 70 गावांमध्ये ही रथयात्रा जाणार आहे. रेणुका मातेच्या जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचून त्यांना या रथयात्रेचा दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन समितीमार्फत करण्यात आला आहे.
advertisement
सौंदत्ती यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येतात, देवीचे दर्शन घेतात. मात्र काही भाविकांना दर्शनाची इच्छा असूनही त्यांना सौंदत्ती डोंगरावर जाणं जमत नाही. अशा भक्तांसाठी या रथयात्रेचा आयोजन करण्यात आलं आहे आणि देवीची भक्तांप्रती असलेली ही श्रद्धा अखंड राहावी यासाठी ही रथयात्रा कोल्हापूर जिल्ह्यातून काढण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.
देवीची अशी आहे मान्यता
जेव्हा जेव्हा देशावर, धर्मावर आणि आईंच्या भक्तांवर संकटं येतात तेव्हा आदिशक्ती, आदिमाया रक्षणासाठी धावली आहे. आता तर आई आपल्या भक्तांसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांची संकटं दूर करण्यासाठी पुन्हा धर्माचा ध्वज जगात मानाने फडकविण्यासाठी, कोल्हापूर जिल्ह्यात रथात बसून येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील कोट्यावधी परिवाराची ती कुलस्वामिनी आहे, देवी मातंगी आदिमाया, आदिशक्ती असुरांचा नाश करण्यासाठी धावली आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 20, 2024 9:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Yellamma Devi: तब्बल 600 वर्षांनी देवी आली दारी, कोल्हापुरात पहिल्यांदाच असं घडतंय!