advertisement

एका डुलकीनं घात केला, दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

Last Updated:

पहाटे ६ च्या सुमारास मेहकर-विखली मार्गावरील नांद्रा धांडे गावाजवळ काळाने घात केला. चालकाला लागलेली एक साधी डुलकी या कुटुंबासाठी जीवघेणी ठरली आणि तिथेच होत्याचं नव्हतं झालं.

News18
News18
रविवारी पहाटेची वेळ... अहमदपूरच्या बागवान गल्लीत उत्साहाचं वातावरण होतं. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी अबालवृद्धांनी पिकअप वाहन सजवलं होतं. गाणी, गप्पा आणि श्रद्धेच्या ओढीने २५ हून अधिक जण प्रवासाला निघाले होते. पण पहाटे ६ च्या सुमारास मेहकर-विखली मार्गावरील नांद्रा धांडे गावाजवळ काळाने घात केला. चालकाला लागलेली एक साधी डुलकी या कुटुंबासाठी जीवघेणी ठरली आणि तिथेच होत्याचं नव्हतं झालं.
प्रवासाचा आनंद शिगेला असतानाच चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव पिकअप रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील महिला आणि लहान मुले लांबवर फेकले गेले. या दुर्घटनेत १८ वर्षांचा अरमान शरीफ बागवान आणि रिहान सैदू बागवान या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
advertisement
१४ जण जखमी; लहान मुलांचाही समावेश
या भीषण अपघातात ६ वर्षांच्या अफिफापासून ते ७५ वर्षांच्या पाशा मोहम्मद यांच्यापर्यंत तब्बल १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लहान मुलांना आणि महिलांना बाहेर काढताना उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. जखमींवर सध्या मेहकर आणि बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र काही जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
advertisement
जखमींची नावं
शहाना नाबीसा बागवान (३५)
शबाना शरीफ बागवान (३५)
बागवान अमीर (१३)
बुशरा आरिफ बागवान (१३)
अनस रोक (१२)
अबुजर बागवान (१०)
रफत शरीफ बागवान (११)
अफिस रौफ बागवान (१५)
मैमीरा नबासाहब बागवान (१५)
अफिफा आरिफ बागवान (६५)
आलिया अनिस बागवान (२५)
पाशा मोहम्मद शाह बागवान (७५)
हिना अरीफ बागवान (३०)
advertisement
साहरा बागवान (६५)
काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका डुलकीनं घात केला, दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement