Shrigonda Election : माजी मंत्री बबन पाचपुतेच्या सुनेला मोठा धक्का! भाजपकडून बी फॉर्म भरला पण ठरला अपक्ष, काय गडबड झाली?

Last Updated:

Shrigonda Municipal Election Indrayani Pachpute : राज्य निवडणूक आयोगाने अचानक काढलेल्या परिपत्रकामुळे मंगळवारी गोंधळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. माजी मंत्री पाचपुते यांच्या सुनेचा अर्ज अपक्ष ठरल्याचं पहायला मिळालं.

Shrigonda Municipal Election Indrayani Pachpute
Shrigonda Municipal Election Indrayani Pachpute
Shrigonda Municipality Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे ट्विस्ट पहायला मिळत आहेत. अशातच श्रीगोंदाची नगरपालिकेची निवडणूक यंदा रंगतदार असणार आहे. मात्र, नगरपालिका निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगाने अचानक काढलेल्या परिपत्रकामुळे मंगळवारी गोंधळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. माजी मंत्री पाचपुते यांच्या सुनेचा अर्ज अपक्ष ठरल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

आधी अर्ज वैध आता अवैध

बी फॉर्म अर्थात डमी उमेदवारांच्या अर्जावर सूचकांची संख्या 5 नसल्यास अर्ज बाद करण्याचे आदेश आल्याने नेवासेत आधी छाननीमधील वैध झालेल्या उमेदवारांना परत बोलवून त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच या निर्णयाविरोधात नेवासेत न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. या निर्णयाचा फटका श्रीगोंदेतही बसला आहे.
advertisement

श्रीगोंद्यात चौरंगी लढत

श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक चौरंगी होत असून, भाजपकडून इंद्रायणी पाचपुते, सुनीता खेतमाळीस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) ज्योती खेडकर, शिवसेना (शिंदे गट) कडून शुभांगी पोटे यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशातच इंद्रायणी पाचपुते यांचा अर्ज अपक्ष ठरल्याने मोठा गोंधळ उडाला.

मंगळवारी अचानक आदेश आला अन्...

advertisement
माजी मंत्री बवानराव पाचपुते यांच्या सून आणि भाजपकडून बी फॉर्म सादर करणाऱ्या इंद्रायणी पाचपुते यांचा अर्ज अपक्ष ठरला आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी 'ए' 'बी' फॉर्म देण्यात येतो. निवडणूक आयोगाच्या आधीच्या नियमानुसार ए व बी फॉर्मसोबत एक सूचक असल्यास अर्ज वैध ठरत होता. पण मंगळवारी अचानक आदेश आला.

...म्हणून अर्ज अवैध ठरवला

advertisement
दरम्यान, आदेशानंतर नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी (बी फॉर्म) उमेदवाराच्या अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा आणि त्या उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास व कागदपत्रांची तसेच अटी शर्तीची पूर्तता केली असल्यास त्याचा अर्ज अपक्ष म्हणून पात्र ठरवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे बबन पाचपुते यांच्या सुनेचा अर्ज अपक्ष ठरवण्यात आलाय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Shrigonda Election : माजी मंत्री बबन पाचपुतेच्या सुनेला मोठा धक्का! भाजपकडून बी फॉर्म भरला पण ठरला अपक्ष, काय गडबड झाली?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement