advertisement

Ajit Pawar : अजितदादांसोबतच विमानात होती राष्ट्रवादीच्या नेत्याची मुलगी, प्लेन क्रॅशमध्ये पिंकी माळीचा हृदयद्रावक मृत्यू

Last Updated:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. मुंबईहून बारामतीला जात असताना लॅन्डिंगच्या वेळी अजित पवारांचं प्रायव्हेट चार्टर विमान कोसळलं.

अजितदादांसोबतच विमानात होती राष्ट्रवादीच्या नेत्याची मुलगी, प्लेन क्रॅशमध्ये पिंकी माळीचा हृदयद्रावक मृत्यू
अजितदादांसोबतच विमानात होती राष्ट्रवादीच्या नेत्याची मुलगी, प्लेन क्रॅशमध्ये पिंकी माळीचा हृदयद्रावक मृत्यू
बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. मुंबईहून बारामतीला जात असताना लॅन्डिंगच्या वेळी अजित पवारांचं प्रायव्हेट चार्टर विमान कोसळलं. या अपघातामध्ये अजित पवारांसह चार्टर प्लेनचे पायलट सुमित कपूर, पायलट शांभवी पाठक आणि चार्टर प्लेन स्टाफ पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.

कोण होत्या पिंकी माळी?

पिंकी माळी या प्रायव्हेट चार्टरमध्ये स्टाफ म्हणून काम करत होत्या. पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
अपघाताच्या एक दिवस आधी पिंकी माळी यांनी त्यांच्या कुटुंबासोबत संवाद साधला होता आणि उद्या बारामतीला जायचं आहे, असं सांगितलं होतं. स्वत: अजित पवार माळी कुटुंबासोबत बोलले होते. दरम्यान पिंकी माळी यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं जाईल आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असं महाराष्ट्र सरकारने माळी कुटुंबाला सांगितलं आहे.
advertisement
पिंकी माळी या तिसऱ्यांदा अजितदादांसोबत चार्टर विमानाने प्रवास करत होत्या. अजितदादांचं विमान नेमकं का कोसळलं? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी बचाव कार्य करणाऱ्या टीमकडून कामाला सुरूवात झाली आहे.
बुधवारी सकाळी अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे चार्टर प्लेनने रवाना झाले, पण बारामती विमानतळावर लॅन्डिंगच्या वेळी विमान कोसळलं. दाट धुक्यामुळे व्हिजिबिलिटी कमी असल्याने रनवे दिसण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळी 8.45 मिनिटांच्या आसपास Learjet 45XR (रजिस्ट्रेशन VT‑SSK)नावाचं चार्टर विमान मुंबईवरून बारामतीकडे जात होतं. हे विमान दिल्लीमधील VSR Aviation (VSR Ventures Pvt Ltd) नावाच्या कंपनीचं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : अजितदादांसोबतच विमानात होती राष्ट्रवादीच्या नेत्याची मुलगी, प्लेन क्रॅशमध्ये पिंकी माळीचा हृदयद्रावक मृत्यू
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement