Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठी घडामोड, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आई पाठोपाठ मुलगाही फरार, रात्रीतून नेमकं काय घडलं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाला आता एका नाट्यमय वळण मिळाले आहे. सलग दोन दिवस चौकशीचा फेरा सोसल्यानंतर, तपास पथकाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब झाला आहे.
नाशिक: संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाला आता एका नाट्यमय वळण मिळाले आहे. सलग दोन दिवस चौकशीचा फेरा सोसल्यानंतर, तपास पथकाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब झाला आहे. विशेष म्हणजे, शिर्डीत गुन्हा दाखल असलेली खरातची पत्नी कल्पना खरात हिने आधीच पलायन केले असून, आता मुलानेही पळ काढल्याने तपास यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
दोन दिवस कसून चौकशी अन्...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या मुलाला एसआयटीने सलग दोन दिवस कसून चौकशी केली. मात्र, चौकशीदरम्यान त्याने तपासात सहकार्य करण्याऐवजी "सर्व काही डॅडाला (वडिलांना) माहीत आहे," अशी एकच भूमिका लावून धरली होती. यावेळी त्याने आपल्या वडिलांकडे मोठ्या प्रमाणावर रोकड पाहिली असल्याची माहिती चौकशीत दिली होती. चौकशीनंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र,
advertisement
अशातच कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता खरातच्या लेकाने रात्रीतून शहर सोडले. त्यामुळे आता तपासात अडथळा निर्माण करण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांच्या नाकाखालून पलायन
कल्पना खरात विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला चौकशीसाठी बोलावण्यापूर्वीच तिने पलायन केले. त्यानंतर आता मुलानेही पोलिसांच्या नाकाखालून पळ काढल्याने विशेष पथकाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहर सोडण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य असतानाही, या नियमांना धाब्यावर बसवून खरातच्या मुलाने मोबाइल बंद करून पळ काढला आहे.
advertisement
२०१३ पासून फसवणुकीचा 'ट्रॅक रेकॉर्ड'
खरातचा फसवणुकीचा इतिहास जुना असल्याचे समोर आले आहे. २०१३ मध्ये ग्राहक न्यायालयात त्याच्याविरुद्ध पहिली तक्रार दाखल झाली होती. प्लॉट देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले होते. त्यावेळी तक्रारदारासोबत सेटलमेंट करून त्याने प्रकरण मिटवले होते, मात्र आता पुन्हा एकदा हे कुटुंब मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठी घडामोड, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आई पाठोपाठ मुलगाही फरार, रात्रीतून नेमकं काय घडलं?







